घरातून झुरळ काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

एखादे झुरळे घरात शिरले की ते संपूर्ण घर दूषित करतात. अशातच खाण्याच्या वस्तूंपासून ते कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींवर झुरळे फिरताना दिसतात. अशावेळेस तुम्हीही झुरळांपासून त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला झुरळांना दूर करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगत आहोत ते जाणून घेऊयात...

घरातून झुरळ काढून टाकण्यासाठी करा हे घरगुती उपाय
cockroach
| Edited By: | Updated on: Jul 19, 2025 | 4:21 PM

पावसाळा सुरू होताच घरांमध्ये आर्द्रता वाढते आणि ही आर्द्रता कीटकांच्या वाढीचे सर्वात मोठे कारण बनते. या ऋतूत सर्वांना सर्वात जास्त त्रास देणारा कीटक म्हणजे झुरळं. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला दिसतील. झुरळं केवळ घाण पसरवत नाहीत तर हे अन्नपदार्थांवर बसून पदार्थ खराब करतात, आणि याच पदार्थांचे सेवन आपण केल्याने आजारी पडतो.

एकदा झुरळं घरात शिरले की त्यांना पूर्णपणे घरा बाहेर काढणे सर्वात कठीण काम असते. जर तुम्हालाही तुमच्या घरात झुरळांच्या वाढत्या संख्येचा त्रास होत असेल तर घाबरू नका. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही या अवांछित पाहुण्यांपासून मुक्ती मिळवू शकता, तेही कोणत्याही विषारी आणि केमिकल उत्पादनांशिवाय. घरातून झुरळांपासून मुक्ती मिळवण्याचे सोपे मार्ग जाणून घेऊयात.

घरातून झुरळांपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय

बेकिंग सोडा आणि साखरेचे मिश्रण

झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बेकिंग सोडा आणि साखरेचे मिश्रण हा एक प्रभावी उपाय आहे. खरं तर, झुरळांना गोडवा आवडतो. यासाठी, बेकिंग सोडा आणि साखर समान प्रमाणात मिक्स करा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. साखर झुरळांना आकर्षित करेल आणि जेव्हा ते साखर खाण्यासाठी येतात तेव्हा बेकिंग सोडा त्यांच्या शरीरावर परिणाम करून त्यांना नष्ट करून टाकेल.

बोरिक पावडरचा वापर

बोरिक ॲसिड पावडर झुरळांना नष्ट करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. ते केवळ झुरळेच नाही तर पावसाळ्यातील इतर कीटकांना देखील मारते. यासाठी, बोरिक पावडर पिठात मिक्स करा आणि पिठाचे छोटे-छोटे गोळे बनवा आणि झुरळे लपलेल्या ठिकाणी ठेवा. झुरळे ते खातील आणि तिथेच मरतील. लक्षात ठेवा की ते मुलांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर असले पाहिजे.

तमालपत्र आणि लवंग प्रभावी

झुरळांना पळवून लावण्यासाठी तमालपत्र देखील एक प्रभावी उपाय आहे. खरं तर, झुरळे तीव्र वासाने पळून जातात. जर तुम्ही घराच्या कोपऱ्यात तमालपत्र ठेवले तर त्याच्या वासामुळे झुरळे पळून जातात. याशिवाय, तुम्ही तमालपत्रासोबत लवंग देखील ठेवू शकता.

लिंबू आणि मीठ पाणी

झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू आणि मीठाचे मिश्रण हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी रात्री फरशी पुसताना बादलीत पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मीठ मिक्स करा, यामुळे झुरळं दूर राहतीलच, शिवाय घर बॅक्टेरियामुक्त आणि सुगंधितही राहील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)