पती पत्नीसाठी पोस्ट ऑफिसमधील ही योजना फायद्याची, पाच वर्षात 13 लाखांची मिळकत

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीसाठी अनेक योजना आहे. या योजनांला लाभ लाखो लोकं घेत आहे. पती पत्नीसाठीही पोस्ट ऑफिसमध्ये एक फायद्याची योजना आहे. या योजनेत गुंतवणू केल्यास 7.7 टक्के व्याज मिळतं आणि पाच वर्षांनी मोठी रक्कम हाती पडते.

पती पत्नीसाठी पोस्ट ऑफिसमधील ही योजना फायद्याची, पाच वर्षात 13 लाखांची मिळकत
पती पत्नीसाठी पोस्ट ऑफिसमधील ही योजना फायद्याची, पाच वर्षात 13 लाखांची मिळकत
| Updated on: Jul 30, 2025 | 8:37 PM

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. कोणत्याही जोखीमेशिवाय गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी ही योजना आहे. ही एक सरकारी हमी योजना असून पाच वर्षांनी परिपक्व होते. यात निवृत्तिनंतरचे पैसे, जमीन विकून मिळालेले पैसे किंवा मोठी रक्कम गुंतवू शकता. कारण यातून तुम्हाला व्याजाच्या रुपाने चांगला परतावा मिळणार हे निश्चित आहे. तुमचे पैसे या योजनेत पूर्णपणे सुरक्षित असतील. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये केवायसी आणि आवश्यक कागदपत्रं सादर करून तुम्ही खातं उघडू शकता. या योजनेत कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. तुम्ही एकटे किंवा संयुक्तपणे खाते उघडू शकता. संयुक्त खात्यासाठी जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती सहभागी होऊ शकतात. 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची मुलंही स्वत:चं खातं उघडू शकतात. मूल लहान असेल किंवा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असेल तर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. तुम्हाला हवं असल्यातं कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी ठेवू शकात. या योजनेत तुम्ही हवी तितकी खाती उघडू शकता.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात तु्म्ही किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता. यात केलेल्या गुंतवणुकीत तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्क सवलत देखील मिळते. तुम्हाला एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त असणार आहे. सध्या या योजनेत वर्षाला 7.7 टक्के व्याज मिळते. हे व्याज चक्रवाढीसह वाढतच जाते. व्याजाची रक्कम 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळते. पहिल्या चार वर्षांचे व्याज पुन्हा गुंतवले जाते. त्या व्याजावरही सूट आहे. पण पाच वर्षांच्या व्याज करपात्र आहे.

या योजनेत गुंतवणूक केली आमि तुन्हा पैशांची गरज भासली तर तु्म्ही बँकेत किंवा एनबीएफसीमध्ये एनएससी गहाण ठेवू शकता. या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला एनएससी मध्येच मोडण्याची गरज भासणार नाही. तसेच पैशांची तरतूद देखील करू शकता. गुंतवणूकदाराला मृत्यूसारख्या विशिष्ट परिस्थितीशिवाय किंवा न्यायालयाच्या आदेश असल्याशिवाय हे खातं पाच वर्षाआधी बंद करता येत नाही.

पती पत्नी नोकरी करत असतील तर त्यांनी संयुक्तपणे हे खाते उघडू शकातत. दोघांनी मिळून या खात्यात 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हा पाच वर्षांनी 13 लाख 4 हजार 130 रुपये मिळतील. यात 4 लाख 4 हजार 130 रुपये व्याजाच्या स्वरुपात असतील.