AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Information : बँकेत 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर बंद होणार खाते? RBI ने दिली महत्वपूर्ण माहिती

RBI Information : बँकेत 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर खाते बंद होणार, हा मॅसेज तुमच्यापर्यंत पण पोहचला असेल. त्यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक जण या मॅसेजची शहानिशा करत आहे, आरबीआयने काय दिली माहिती..

RBI Information : बँकेत 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर बंद होणार खाते? RBI ने दिली महत्वपूर्ण माहिती
| Updated on: Jun 17, 2023 | 3:22 PM
Share

नवी दिल्ली : बँकेत 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर खाते बंद होणार, हा मॅसेज तुमच्यापर्यंत पण पोहचला असेल. याविषयीच्या वृत्तात दावा केल्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने (RBI Governor) बँक खात्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा केली असून खातेदाराच्या खात्यात 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास खाते बंद करण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक जण या मॅसेजची शहानिशा करत आहे. RBI ने बँकेने याविषयीच्या व्हायरल बातमीची शहानिशा केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर यांनी पीआयबीच्या माध्यमातून ट्विटर हँडलवरुन (Twitter) यासंबंधीचे स्पष्टीकरकण दिले आहे.

ही माहिती चुकीची आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या एका कथित व्हिडिओ आधारे ही बातमी देण्यात आली होती, पण ही बातमी आणि व्हिडिओ पूर्णतः चुकीचा असल्याचा दावा पत्र सूचना कार्यालयाने (PIB) केला आहे. या वृत्तात आणि व्हिडिओत कुठलेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

काय केले ट्विट पीआयबीने याविषयीचे ट्विट केले आहे. त्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने बँक खात्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा केली असून खातेदाराच्या खात्यात 30,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास खाते बंद करण्यात येईल, असे वृ्त्त पूर्णतः खोटे आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पीआयबीने हे फॅक्ट चेक केले असून त्यात हा दावा खोडून काढण्यात आला आहे.

1000 रुपयांची नोट येणार की नाही ? येत्या चार महिन्यांत 2000 रुपयांच्या नोटांची हळूहळू घरवापसी होणार आहे. देशात आता अधिक मूल्याची नोट हवी म्हणून 1000 रुपयांची नोट येणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तर या चर्चांचा ऊत आला आहे. अनेक लोकांना केंद्र सरकार 2000 रुपयांची नोट बंद करुन 1000 रुपयांची नोट घेऊन येईल, असे वाटते. या चर्चा सुरु असतानाच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयी मोठा खुलासा केला आहे.

RBI गव्हर्नरचे म्हणणे काय भारतात 1000 रुपयांची नोट येणार असल्याच्या चर्चांवर RBI गव्हर्नर यांनी चर्चा दिली आहे. त्यानुसार, 1000 रुपयांची नोट आणण्याचा कोणताच प्रस्ताव नाही. या अफवा आहेत. बाजारात दुसऱ्या मूल्यांचं चलन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. चार महिन्यांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आता 500 रुपयांची नोट अधिक मूल्यांची देशात अजून 1000 रुपयांच्या नोटेचा काहीच फैसला झालेला नाही. 2000 रुपयांच्या नोटेची घरवापसी झाली आहे. त्यामुळे बाजारात 500 रुपयांची नोट अधिक मूल्यांची नोट ठरली आहे.

या नोटा चलनातून बाद आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी 1946 मध्ये पहिल्यांदा 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा जानेवरी 1978 मध्ये पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.

अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला.
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन.
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.