तुमच्याकडे असतील ‘या’पेक्षा अधिक सीम कार्ड तर होऊ शकतात बंद; दूरसंचार विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

| Updated on: Dec 09, 2021 | 9:39 AM

जर तुमच्याकडे अधिक सीमकार्ड असतील तर ते आता बंद होऊ शकतात. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

तुमच्याकडे असतील यापेक्षा अधिक सीम कार्ड तर होऊ शकतात बंद; दूरसंचार विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Follow us on

मुंबई : जर तुम्ही नऊपेक्षा अधिक सीम कार्डचा उपयोग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ज्या ग्राहकांकडे नऊपेक्षा अधिक सीम कार्ड आहेत, त्या ग्राहकांच्या नावावर असलेल्या सर्व सीम कार्डची नव्याने पडताळणी करण्याचा निर्णय दूरसंचार विभागाकडून घेण्यात आला आहे. कागदपत्रे योग्य न आढळल्यास संबंधित सीम बंद करण्याचा आदेश देण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर आणि पुर्वेकडील राज्यात सीमची मर्यादा सहापर्यंत ठेवण्यात आली आहे.

 काय आहे नवा नियम?

दूरसंचार विभागाने काढलेल्या  या नव्या आदेशानुसार जर तुमच्याकडे नऊपेक्षा अधिक सीम कार्ड असतील तर तुम्हाला जी चालू ठेवायची आहेत ती तुम्ही चालू ठेवू  शकता. इतर कार्ड बंद करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र जर तुम्ही नऊपेक्षा अधिक सीम कार्ड सुरूच ठेवले असतील तर सर्व सीम कार्डची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे. कागदपत्रे योग्य न आढळल्यास संबंधित सीम बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुन्ह्यांना आळा बसणार 

दिवसेंदिवस विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोबाईचा सहभाग वाढत आहे. अनेकदा गुन्हेगार चुकीची किंवा अर्धवट माहिती देऊन नवे सीम खरेदी करतात. काही सीम दुसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या नावावर देखील घेतले जाते. अशा सीमचा वापर करून, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे केले जातात.  या सर्वप्रकारला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाकडून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदी स्वस्त, पटापट तपासा भाव

नोकरदार ‘या’ 4 ठिकाणी गुंतवणूक करणार, करबचतीसह मोठा नफा मिळणार

रेल्वे 1.5 लाख तरुणांना देणार नोकऱ्या, कोणत्या दिवशी RRB NTPC लेव्हल-1 चा निकाल?