एफडीमध्ये गुंतवणूक करायचीय, तर मग जाणून घ्या विविध बँकांचे व्याजदर

| Updated on: Jun 01, 2021 | 8:40 AM

रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणात अर्थात रेपो रेट, आर्थिक स्थितीत आणि कर्ज मागणीमध्ये काही बदल झाला असेल तर त्याआधारे एफडीवरील व्याज निश्चित केले जाते. (If you want to invest in FDs, then know the interest rates of various banks)

एफडीमध्ये गुंतवणूक करायचीय, तर मग जाणून घ्या विविध बँकांचे व्याजदर
Follow us on

नवी दिल्ली : गुंतवणूकीसाठी फिक्सड डिपॉझिट अर्थात मुदत ठेवीचा (एफडी) पर्याय नेहमीच उत्तम मानला जातो. यात मिळणाऱ्या कर्जासह इतर सुविधांमुळे लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास पहिली पसंती देतात. जर तुम्हीसुद्धा एफडीमध्ये पैसे गुंतवणुकीचा विचार करीत असाल तर एसबीआय, पीएनबी यांसारख्या मोठ्या बँकांतील गुंतवणुकीवर कुठे आणि किती व्याज मिळते हे जाणून घ्या. त्यामुळे कुठल्याही बँकेत पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही तुम्हाला चांगला परतावा मिळणाऱ्या बँकेला पहिली पसंती देऊ शकाल. त्यातून तुम्हाला अपेक्षित मोठा आर्थिक लाभ मिळू शकेल. (If you want to invest in FDs, then know the interest rates of various banks)

एफडींवरील व्याजदर हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणानुसार ठरतो. म्हणजेच जर रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणात अर्थात रेपो रेट, आर्थिक स्थितीत आणि कर्ज मागणीमध्ये काही बदल झाला असेल तर त्याआधारे एफडीवरील व्याज निश्चित केले जाते. तुम्हाला सध्या कोरोना महामारीच्या काळात या बदलांचा एफडीच्या व्याजदरावर झालेला परिणाम दिसून आलाच असेल. कोरोना महामारीमुळे काही बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केले आहे. याच पार्श्वभूमीवर जर आता बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर विविध बँकांकडून दिल्या जाणाऱ्या व्याजदरांची तुलना करा. त्यानंतरच तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

एसबीआय

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयमध्ये एफडी खोलण्याचा विचार करीत असाल तर काय फायदा होईल हे समजून घ्या. जर तुम्ही 3 ते 5 वर्षांसाठी एफडीमध्ये पैसे ठेवणार असाल तर या गुंतवणुकीवर तुम्हाला 5.4 टक्के व्याज मिळेल. याच अवधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बीपीएस व्याज दर मिळेल. याशिवाय 46 दिवसांपासून 179 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 3.9 टक्के व्याज आणि 180 दिवसांपासून ते एक वर्षापर्यंतच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज मिळेल.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर जास्तीत जास्त 5.5 टक्के व्याज उपलब्ध करून देते. आपण 7 दिवसांपासून 14 दिवसांपर्यंतच्या अवधीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर कमीत कमी 2.5 टक्के इतके व्याज मिळवू शकाल.

अ‍ॅक्सिस बँक

अ‍ॅक्सिस बँकेत 7 दिवसांपासून 10 वर्षांच्या कालावधीदरम्यान एफडीमध्ये सामान्य ग्राहकांना 2.5 ते 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना निवडक एफडी योजनेत मॅच्युरिटी पिरियडच्या आधारे ज्यादा व्याज दिले जाते.

आयडीएफसी फर्स्ट बँक

या बँकेत सात दिवसांपासून एक वर्षांच्या शॉर्ट-टर्म एफडीमध्ये प्रत्येक वर्षाला 2.75 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल. तसेच एक वर्षापासून दहा वर्षांपर्यंतच्या लॉन्ग-टर्मसाठी एफडी केल्यास प्रतिवर्षी 6 टक्के दराने व्याज मिळवू शकाल.

पीएनबी

पंजाब नॅशनल बँकेमध्ये एका वर्षासाठी एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर 5.10 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर जर तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 5.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. (If you want to invest in FDs, then know the interest rates of various banks)

 

इतर बातम्या

PHOTO | शेअर बाजाराकडून 100 कोटी कमावणाऱ्या व्यक्तीचा गुंतवणूकदारांना सल्ला, या स्टॉक्सपासून दूर राहिल्यास होणार नाही नुकसान

VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, टँकरमधून केमिकल गळती, वाहने घसरल्याने वाहतूक विस्कळीत