
भारतीय रेल्वेकडून एक महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पूर्व रेल्वेने कळवले आहे की, प्रवासी आरक्षण प्रणाली काही काळासाठी उपलब्ध होणार नाही. पूर्व रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील पॅसेंजर आरक्षण प्रणाली (पीआरएस) डेटा सेंटरमध्ये डाउनटाइम अॅक्टिव्हिटीमुळे ही सेवा उपलब्ध होणार नाही.

23 ऑक्टोबर रोजी रात्री 11.45 ते 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 पर्यंत डाउनटाईम असेल. या काळात इंटरनेट बुकिंग, चौकशीसह सर्व सेवा पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व कोस्ट रेल्वे, दक्षिण कोस्ट मध्य रेल्वे, ईशान्य सीमावर्ती रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वेमध्ये काम करणार नाहीत.

तांत्रिक गोष्टींच्या देखभालीसाठी काही तासांसाठी तिकीट बुकिंग सेवा बंद राहणार आहे. वेळोवेळी रेल्वेकडून अशाप्रकारे काही तासांसाठी सेवा खंडित केली जाते. मात्र, प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून ही कामे शक्यतो मध्यरात्रीनंतर केली जातात.

ऑगस्ट महिन्यात दक्षिण रेल्वेकडून अशीच अधिसूचना जारी करण्यात आली होती. जेणेकरून लोक त्यांचे काम या वेळेपूर्वीच पूर्ण करतील. या काळात IRCTC च्या संकेतस्थळाचा वापर करता येत नाही.

ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे आपली प्रणाली अपग्रेड करण्यासाठी लहान डाउनटाइम करते. कोलकाता येथील पीआरएस डेटा सेंटरमध्ये डाउनटाइम अॅक्टिव्हिटी दरम्यान ही प्रणाली अपग्रेड केली जाईल, जेणेकरून प्रवाशांना भविष्यात चांगली सेवा मिळेल.