Insurance policy : पॉलिसी कोणती फायदेशीर ‘एंडोमेंट’ की मनी बॅक? समजून घ्या दोन्हीमधला मूलभूत फरक

| Updated on: Jun 19, 2022 | 11:29 AM

अनेक जण एंडोमेंट पॉलिसी घ्यावी की मनी बॅक पॉलिसी याबाबत संभ्रमात असतात. आज आपण दोन्हीमधला मुलभूत फरक जाणून घेणार आहोत.

Insurance policy : पॉलिसी कोणती फायदेशीर एंडोमेंट की मनी बॅक? समजून घ्या दोन्हीमधला मूलभूत फरक
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

सुधाकर मोहरीची विक्री करून नुकतेच घरी पोहोचले. एवढ्यात त्यांचा नातेवाईक असलेला विमा एजंट घरी आला. त्यांनी सुधाकररावांना एंडोमेंट आणि मनी बॅक इन्शुरन्स पॉलिसी (Insurance policy) समजावून सांगायला सुरुवात केली. विम्याबद्दल काहीच माहिती नसल्याने एंडोमेंट पॉलिसी (Endowment policy) घ्यायची की मनी बॅक पॉलिसी घ्यायची याबाबत सुधाकर यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. सुधाकर यांच्याप्रमाणे जीवन विमा पॉलिसी (Life insurance policy) घेताना बहुतेक लोक गोंधळून जातात. तुम्हाला आर्थिक जोखीम कव्हर करायची असल्यास टर्म प्लॅन हा सर्वात स्वस्त विमा पॉलिसी आहे. बचत किंवा गुंतवणूक न करता विमा हवा असल्यास टर्म विमा हा सर्वोत्तम पर्याय आहे. या पॉलिसीमध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला विम्याची रक्कम मिळते. एंडोमेंट आणि मनी बॅक पॉलिसी या दोन्ही पारंपरिक विमा योजना आहेत. यात बचत आणि विमा या दोन्हींचे मिश्रण आहे. हे दोन्ही प्लॅन बऱ्याच दिवसांपासून बाजारात आहेत. विमा कंपन्या त्यांची वेगवेगळ्या नावाने विक्री करतात. तुमच्यासाठी कोणती विमा पॉलिसी अधिक चांगली असेल? हे समजून घेण्यासाठी एंडोमेंट आणि मनी बॅक योजनांबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊयात.

एंडोमेंट आणि मनी बॅक प्लॅनमधील समानता

या दोन्ही विमा योजनांमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला पैसे मिळतात. जर विमाधारक जिवंत असेल आणि पॉलिसीची मुदत संपली असल्यास दोन्ही योजनांमध्ये पॉलिसीधारकाला बोनससह प्रीमियमची रक्कम परत मिळते. याला सम एश्युर्ड म्हणतात. दोन्ही योजनेत जोखीम नाही. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पैसे परत मिळणार. परंतु, नियमितपणे हप्ते भरणं गरजेचं आहे.

एंडोमेंट आणि मनी बॅक प्लॅनमधील फरक

या दोन योजनांमधील मूलभूत फरक म्हणजे जिवित लाभ. पॉलिसी खरेदी केल्यापासून ते मॅच्युरिटीपर्यंत मिळणाऱ्या पैशाला सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणतात. एंडोमेंट प्लॅनमध्ये पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हायव्हल बेनिफिट मिळतो . यालाच पॉलिसी मुदत संपली असे म्हणतात. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर मिळणाऱ्या पैशात सम एश्युर्ड आणि बोनसचा समावेश असतो. मनी बॅक प्लॅनमध्ये हप्ता वेळेवर भरल्यास, सर्व्हायव्हल बेनिफिटच्या रुपात विमा कंपनी दर पाच वर्षांनी किंवा ठराविक अंतरानंतर काही पैसे परत देते. म्हणूनच या योजनेला मनी बॅक प्लॅन असे म्हणतात. मनी बॅकच्या स्वरुपात मिळालेले पैसे हे विमा रकमेचे समएश्युर्डच्या प्रमाणात असतात. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर,सम एश्युर्ड आत्तापर्यंत दिलेले सर्व्हायव्हल बेनिफिटमधील रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम दिली जाते. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला असल्यास संपूर्ण सम एश्युर्ड रक्कम दिली जाते. अशावेळी सर्व्हायव्हल बेनिफिटची रक्कम दिली असली तरीही कोणतीही रक्कम वजा केली जात नाही.

हे सुद्धा वाचा

हप्ता आणि परतावा

एंडोमेंट आणि मनी बॅक पॉलिसीमधील फरक समजून घेण्यासाठी आपण एलआयसीच्या न्यू एंडोमेंट प्लॅन (914) आणि न्यू मनी बॅक प्लॅन (920) चे उदाहरण पाहूयात. समजा दिलीप पाटलाचे वय 30 वर्षे आहे आणि तो 20 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचा प्लॅन खरेदी करतो. मनी बॅक प्लॅनमध्ये हप्ता जास्त असतो तर परतावा कमी मिळतो. लक्षात ठेवा या योजनांमध्ये निश्चित असा परतावा मिळत नाही. ही गणना केवळ उदाहरणादाखल LIC अॅपवर आधारित आहे. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार विमा खरेदी करा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एंडोमेंट योजना खरेदी करू शकता. एंडोमेंटमध्ये विम्यासोबत गुंतवणुकीची सुविधाही उपलब्ध आहे. एंडोमेंटमध्ये विमा घेतल्या व्यक्तीचे वय आणि आरोग्यावर पॉलिसीचा हप्ता ठरतो मॅच्युरिटीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करायची नसल्यास मनी बॅक पॉलिसी निवडू शकता. मात्र त्यात परतावा कमी मिळतो.