पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, दहा वर्षात मिळवा डबल

| Updated on: Dec 13, 2021 | 1:45 PM

भविष्यात तुम्ही जर छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या योजना एक चांगला पर्याय ठरू शकतात. पोस्टाच्या सर्वच योजनांमध्ये बँकेच्या विविध योजनांपेक्षा अधिक व्याज मिळते. तसेच ठेवीची जोखीम देखील कमी असते.

पोस्टाच्या या योजनेत गुंतवा पैसे, दहा वर्षात मिळवा डबल
Follow us on

नवी दिल्ली : भविष्यात तुम्ही जर छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या योजना एक चांगला पर्याय ठरू शकतात. पोस्टाच्या सर्वच योजनांमध्ये बँकेच्या विविध योजनांपेक्षा अधिक व्याज मिळते. तसेच ठेवीची जोखीम देखील कमी असते. समजा तुम्ही बँकेच्या एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवले आहेत आणि त्या बँकेचे दिवाळे निघाले तर तुम्हाला केवळ पाच लाखांपर्यंतच पैसे वापस मिळू शकतात. मात्र पोस्टाचे तसे नसते, तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत केले जातात. म्हणजेच तुम्ही कोणतीही जोखमी न घेतला पैसे गुंतवू शकता. अशाच एका पोस्टच्या सर्वोत्तम स्कीमबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

किसान विकास पत्र  योजना

किसान विकास पत्र  ही एक पोस्ट विभागाकडून सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा समावेश हा पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये होते. या योजनेत तुम्ही पैसे गुंतवल्यास 124 महिने अर्थात दहा वर्ष चार महिन्यांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. या योजेनंतर्गत तुम्हाला तुमच्या ठेवीवर वार्षिक 6.9 टक्के दराने व्याज मिळते. हे व्याज बँकेच्या विविध योजनांच्या तुलनेत अधिक आहे. तुम्ही या योजनेमध्ये कमीत कमी एक हजार रुपये गुंतवू शकता, जास्तीत जास्त कितीही पैशांची गुंतवणूक या योजनेंतर्गंत तुम्हाला करता येते. पोस्टाच्या या स्कीममध्ये गुंतवणुकीचे कोणतेही बंधन नाही.

खाते कोण उघडू शकते?

किसान विकास पत्र  या योजनेमध्ये कोणालाही खाते उघडता येऊ शकते, फक्त संबंधित व्यक्तीने आपल्या वयाचे अठरा वर्ष पूर्ण  केलेले असावेत.  या खात्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे तीन जणांना मिळून जॉईन खाते देखील सुरू करता येते. या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर  पैसे गुंतवलेल्या दिवसापासून दहा वर्ष  चार महिन्यानंतर योजनेची मुदत पूर्ण होते, व तुम्हाला दुपट्ट रक्कम मिळते. समजा एखाद्या व्यक्तीने पैसे गुंतवले आहेत, मात्र त्याचा मध्येच मृत्यू झाला तर त्यांने या योजनेसाठी ज्या व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून  नोंदवले असेल त्याच्या नावावर हे खाते ट्रान्सफर करता येते.

संबंधित बातम्या 

मद्यप्रेमींसाठी खुशखबर; नववर्ष, ख्रिसमसला मिळणार स्वस्त दारू

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम