मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम, अटी व व्याजदर…

| Updated on: Feb 27, 2022 | 1:46 PM

मालमत्तेवरील कर्जावर सुरुवातीला 7.9 टक्के व्याजदर आकारले जात आहे. तर कमाल रक्कम 10 कोटी रुपयांपर्यंत ऑफर केली जात आहे. बँका जास्तीत जास्त 20 वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज देत आहेत.

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम, अटी व व्याजदर...
फाईल फोटो
Image Credit source: tv9
Follow us on

पैशांच्या छोटो मोठ्या गरजांसाठी क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज आदी पर्याय उपलब्ध असतात. परंतु ज्या वेळी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते त्यावेळी हे पर्याय कामात येत नाही. मुलांचे लग्न, परदेशातील अभ्यासाचा खर्च किंवा व्यवसाय करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. अशा वेळी पैसा कसा उभारावा? असा प्रश्‍न पडत असतो. यासाठी अनेक जण सोसायटी इत्यादींतून कर्जदेखील काढत असतात. त्या प्रमाणे दुसरा एक पर्याय असतो तो म्हणजे, मालमत्तेवरील कर्ज. (loan against property) हे कर्जे सुरक्षित कर्जे (Secured loans)आहेत, त्यामुळे त्यांचे व्याजदर जास्त नसतात आणि कर्जाची रक्कम लोकांच्या मालमत्तेचे मूल्य आणि त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नाच्या आधारे जारी केली जाते. जर तुम्हालाही कर्जाची गरज असेल आणि तुम्हाला मालमत्ता (property) गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल, तर या लेखात मालमत्तेवर कर्जाशी संबंधित अटी आणि नियम सांगणार आहोत. बँक ऑफ बडोदाच्या ब्लॉगच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे.

‘प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन’ची वैशिष्ट्ये

बँक ऑफ बडोदाच्या म्हणण्यानुसार, मालमत्तेवर कर्जाद्वारे जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उभारले जाऊ शकते. आणि कर्जाची परतफेड 15 वर्षांपर्यंतच्या कालावधीसह केली जाऊ शकते, कर्जाची रक्कम आणि कर्जाची मुदत मालमत्तेचे मूल्य आणि ग्राहकाच्या वयावर अवलंबून असते. बँक ऑफ बडोदाच्या मते, हे उत्पादन कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेचे मूल्य वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण कर्ज म्हणून मिळालेल्या रकमेतून तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मालमत्तेचा वापर करू शकता आणि कर्जाची परतफेड करून पुन्हा एकदा तुमच्या मालमत्तेची मालकी मिळवू शकता.

LAP च्या अटी काय आहेत

मालमत्तेवर कर्ज फक्त मालमत्तेच्या मालकालाच दिले जात असते. यासाठी अर्जासोबत अर्जदाराला त्याच्या मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. यासोबतच कर भरल्याच्या पावत्या, पाणीपट्टी आदी सर्व आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. बँका फक्त मालमत्तांवर कर्ज देत नाहीत. सर्व मालमत्तेच्या कागदपत्रांसोबतच अर्जदाराच्या उत्पन्नाची कागदपत्रेही मागवली जातात. मालमत्तेचे बाजारमूल्य आणि अर्जदाराच्या उत्पन्नाच्या आधारे कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.

किती व्याजदर आकारतात

BankBazaar.com नुसार, मालमत्तेवर कर्ज 7.9 टक्के प्रारंभिक व्याज दर आकारले जाते. त्याच वेळी, 10 कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. बँका जास्तीत जास्त 20 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज देत आहेत. अॅक्सिस बँक 7.9 टक्के ते 9.3 टक्के या मर्यादेत 5 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 8.45 टक्के, एचडीएफसी 8 टक्के, कोटक महिंद्रा बँक 9.5 टक्के दराने कर्ज देत आहे.

इशान किशनपाठोपाठ स्मृती मानधनाच्याही डोक्यावर बॉल आदळला! रिटायर्ड हर्ट होऊन माघारी

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडून दुजाभाव; भुजबळांचा आरोप, राणेंबद्दल म्हणाले…

Nashik | पोस्ट व्हायरल करायची अन्…शेलारांनी सांगितले ठाकरे सरकारचे टूलकिट