LIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; नोकरीला लागण्यापूर्वीच तुमचं मूल होईल लखपती

| Updated on: Jun 15, 2021 | 2:54 PM

LIC schemes | या योजनेत तुम्हाला प्रतिदिन 150 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या पद्धतीने गुंतवणूक केल्यास नोकरीला लागण्यापूर्वी तुमच्या पाल्याच्या खात्यात लाखभर रुपये जमा असतील.

LIC च्या या पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; नोकरीला लागण्यापूर्वीच तुमचं मूल होईल लखपती
LIC पेन्शन प्लॅन
Follow us on

मुंबई: आई-वडील हे नेहमीच आपल्या पाल्याच्या भविष्याची योग्य तजवीज कशी होईल, या चिंतेत असतात. आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी वेळच्यावेळी पैसे कसे उपलब्ध होतील, याची विवंचनाही पालकांना असते. त्यामुळे पाल्याच्या जन्मापासूनच आई-वडील पैसे साठवायला सुरुवात करतात. मात्र, हे पैसे कोणत्या योजनांमध्ये गुंतवल्यावर अधिक फायदा मिळेल, याची माहिती अनेकांना नसते. (LIC New Children’s Money Back Plan for your kids)

अशाच पालकांसाठी एलआयसीची न्यू चिल्ड्रेन मनी बँक स्कीम (New Children’s Money Back Plan) एक चांगला पर्याय ठरू शकते. आपल्याकडे एलआयसीची गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी LIC च्या न्यू चिल्ड्रेन मनी बँक योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. या योजनेत तुम्हाला प्रतिदिन 150 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या पद्धतीने गुंतवणूक केल्यास नोकरीला लागण्यापूर्वी तुमच्या पाल्याच्या खात्यात लाखभर रुपये जमा असतील.

18, 20 आणि 22 व्या वर्षी पैसे परत मिळणार

न्यू चिल्ड्रेन मनी बँक स्कीम ही 25 वर्षांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते. यापैकी पहिला हप्ता पाल्य 18 वर्षांचा झाल्यावर, त्यानंतर 20 व्या वर्षी दुसरा आणि मुलगा किंवा मुलगी 22 वर्षांची झाल्यावर तिसऱ्या हप्त्यातील रक्कम मिळते. या तिन्ही हप्त्यांमध्ये मॅच्युरिटीची प्रत्येकी 20 टक्के रक्कम अदा केली जाते. तर तुमचा पाल्य 25 वर्षांचा झाल्यावर उर्वरित 40 टक्के पैसे आणि बोनस दिला जातो.

या पॉलिसीची वैशिष्ट्ये काय?

1. मुलगा किंवा मुलगी 12 वर्षाची होईपर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणुकीला सुरुवात करु शकता.

2. यामध्ये किमान विमा राशी एक लाख रुपये इतकी आहे. त्यापुढे किती गुंतवणूक करायची याची कोणतीही मर्यादा नाही.

3. मॅच्युरिटीची 60 टक्के रक्कम तीन टप्प्यात, तर 40 टक्के रक्कम योजनेचा कालावधी संपल्यानंतर दिली जाते.

4. तीन टप्प्यातील मनी बॅक सुविधा न घेतल्यास मुदत पूर्ण झाल्यानंतर एकत्रित रक्कम व्याजासह मिळते.

संबंधित बातम्या:

PAN Aadhaar Linking: 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द, भरावा लागणार दंड

असली की नकली, खरा हिरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्स

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय, करसवलत मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा सविस्तर

(LIC New Children’s Money Back Plan for your kids)