Google Maps ने आणलं नवीन फीचर, जाणून घेऊ शकता रस्त्यांवरील टोलची माहिती आणि किंमत!

| Updated on: Jun 15, 2022 | 11:23 PM

तुम्ही सुट्टीला कुठे बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तुम्ही त्या मार्गावरील टोल आणि टोलच्या किमती गुगल मॅपच्या नव्या फिचरद्वारे (New feature) जाणून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचं बजेट निश्चित करण्यासाठी नक्कीच मदत होईल.

Google Maps ने आणलं नवीन फीचर, जाणून घेऊ शकता रस्त्यांवरील टोलची माहिती आणि किंमत!
गुगल मॅपवर नवे टोल फिचर
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : गुगल मॅपने (Google Maps) यूजर्सना एक खास गिफ्ट दित नवं फिचर आणलं आहे. हे फिचर यूजर्ससाठी खूप उपयोगी ठरणार आहे. तुम्ही सुट्टीला कुठे बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तुम्ही त्या मार्गावरील टोल (Toll) आणि टोलच्या किमती गुगल मॅपच्या नव्या फिचरद्वारे (New feature) जाणून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचं बजेट निश्चित करण्यासाठी नक्कीच मदत होईल. गुगलने भारत, अमेरिका, जापान आणि इंडोनेशियातील यूजर्ससाठी गुगल मॅपने हे खास फिचर दिलं आहे. या द्वारे तुम्ही कोणत्याही मार्गावरील टोल आणि टोलच्या किमतीची माहिती देईल.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फिचर अमेरिका, भारत, जापान आणि इंडोनेशियात आपल्या आयओएस आणि अँड्रॉईड अॅपसाठी जवळपास 2 हजार टोल मार्गांसाठी उपलब्ध आहे. तसंच लवकरच हे फिचर अन्य अधिक देशांमध्ये देण्याची कंपनीची योजना आहे.

भारत, अमेरिका, जापान आणि इंडोनेशियात उपलब्ध

गुगलने एप्रिलमध्ये भारत, अमेरिका, जापान आणि इंडोनेशियात मॅपवर टोलची माहिती आणि त्याची किंमत देण्याबाबत माहिती दिली होती. गुगल मॅपमधील हे फिचर टोल मार्ग आणि टोल विरहीत रस्त्यांची निवड करण्यात मदत करेल. या फिचरद्वारे लोक आपल्याला ज्या मार्गावरून जायचं आहे त्या मार्गावरील टोलची संख्या आणि टोलच्या किमतीबाबत योग्य माहिती मिळवू शकतात. गुगलने सांगितलं ही या फिचरद्वारे मिळणारी टोलची माहिती ही स्थानिक टोलिंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित असणार आहे.

कसे वापरणार नवे फीचर?

यासाठी गुगल मॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री-डॉटवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला रूट पर्याय निवडून त्या मार्गाचा वापर करता येणार आहे. येत्या महिन्याभरात Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी ही सुविधा वापरता येईल. भारत, यूएसए, जपान आणि इंडोनेशियामधील सुमारे 2000 टोल असणाऱ्या रस्त्यांसाठी हा पर्याय असून येत्या काळात हे फीचर इतर देशांमध्येही सुरु होईल.