आता पेटीएमवर बुक करा सिलिंडर आणि नंतर पैसे द्या; या ऑफर्ससह मिळेल हा फायदा

| Updated on: Jun 28, 2021 | 3:54 PM

पेटीएम अॅपद्वारे पहिल्यांदा एलपीजी सिलिंडर बुक करणार्‍या वापरकर्त्यांसाठी 3 सिलिंडर बुकिंगवर कंपनीने 900 रुपयांपर्यंतचे निश्चित कॅशबॅक देखील जाहीर केले आहे. (Now book the cylinder on Paytm and then pay; This is the advantage you get with these offers)

आता पेटीएमवर बुक करा सिलिंडर आणि नंतर पैसे द्या; या ऑफर्ससह मिळेल हा फायदा
Follow us on

नवी दिल्ली : भारतातील आघाडीचे डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने आता आकर्षक ऑफर्स आणि कॅशबॅकसह नवीन वैशिष्ट्ये घेऊन एलपीजी सिलिंडर बुकिंग अनुभव नवीन बनवण्याची घोषणा केली आहे. आता वापरकर्ते पेटीएमद्वारे आयव्हीआर, मिस कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरुन बुकिंगसाठी पैसे भरू शकतात. हे वैशिष्ट्य त्यांना इतर कोणत्याही प्‍लेटफॉर्मद्वारे किंवा चॅनेल माध्यमातून सिलिंडर बुक करूनही अनेक तास पेटीएमद्वारे पेमेंट देण्यास सक्षम करते. (Now book the cylinder on Paytm and then pay; This is the advantage you get with these offers)

पेटीएम अॅपद्वारे पहिल्यांदा एलपीजी सिलिंडर बुक करणार्‍या वापरकर्त्यांसाठी 3 सिलिंडर बुकिंगवर कंपनीने 900 रुपयांपर्यंतचे निश्चित कॅशबॅक देखील जाहीर केले आहे. वापरकर्त्यांना पेटीएमवर बुक केलेल्या प्रत्येक सिलिंडरवर निश्चित पेटीएम फर्स्ट पॉईंट्स देखील मिळतील, जे त्यांच्या वॉलेट बॅलन्स आणि लोकप्रिय ब्रँडच्या डिस्काउंट व्हाउचरच्या रूपात परत मिळू शकतात.

नंतर पैसे देण्याचा पर्याय

इंडेन, एचपी गॅस आणि भारतगॅस या तीन मोठ्या एलपीजी कंपन्यांच्या सिलिंडर बुकिंगवर ही ऑफर लागू आहे. पेटीएम पोस्टपॅडवर नोंदणी करून सिलिंडर बुकिंगसाठी नंतर पैसे देण्याचा पर्यायही ग्राहकांना असेल. पेटीएम वापरकर्ते सिलिंडरची बुकिंग करण्यापूर्वी किंमत तपासू शकतात आणि त्यांचे इंडियन ऑइल एक्स्ट्रा रिवॉर्ड्स लॉयल्टी पॉईंट्सदेखील परत मिळवू शकतात.

असा मिळेल लाभ

पेटीएम अ‍ॅपवर आता उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यानुसार, ग्राहकांना गॅस सिलिंडरच्या वितरणाचा मागोवा घेण्याची आणि रिफिल्साठी ऑटोमेटेड इंटेलिजेंट रिमाइंडर्स मिळविण्याची क्षमता देखील आहे. पेटीएमच्या विना त्रास आणि सोप्या बुकिंग प्रक्रियेमुळे एलपीजी सिलिंडरचे बुकिंग करणे अधिक सोपी प्रक्रिया बनली आहे. वापरकर्त्याला फक्त ‘बुक गॅस सिलिंडर’ टॅबवर जाणे आवश्यक आहे, गॅस कंपनी निवडावी, मोबाईल नंबर / एलपीजी आयडी / ग्राहक क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि नंतर पैसे द्यायचे आहेत. सिलेंडर जवळच्या गॅस एजन्सीद्वारे वापरकर्त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर वितरीत केले जाते.

यामुळे दिल्या जात आहेत या सुविधा

पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, आमच्यासाठी एलपीजी सिलिंडर बुकिंग हे युटिलिटी श्रेणीमध्ये महत्त्वाचे फोकस क्षेत्र आहे. आम्ही आमच्या सेवेत नेहमीच नवीन काही करण्यात यशस्वी होतो आणि हा नवीन बुकिंग फ्लो त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. आम्हाला आमच्या वापरकर्त्यांच्या गरजा ओळखतो आणि त्यानुसार आमची उत्पादने आणि तंत्रज्ञान टीमद्वारे सखोल संशोधनानंतर नवीनतम वैशिष्ट्ये विकसित केली गेली आहेत. (Now book the cylinder on Paytm and then pay; This is the advantage you get with these offers)

इतर बातम्या

Video | मग्न असल्याचे बघताच सिंहिणीचा अचानपणे हल्ला, हत्तीने पुढे काय केले ? एकदा पाहाच

सुनेच्या सेटवर मिथुन चक्रवर्तींची सरप्राईज व्हिजीट, ‘अनुपमा’सोबत जुन्या आठवणींना उजाळा!