सुनेच्या सेटवर मिथुन चक्रवर्तींची सरप्राईज व्हिजीट, ‘अनुपमा’सोबत जुन्या आठवणींना उजाळा!  

स्टार प्लसची प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ (Anupamma) ही चाहत्यांमध्ये खूपच पसंत केली जात आहे. रुपाली गांगुली (Rupali Ganguly), सुधांशु पांडे (Sudhanshu Pandey) आणि मदलसा शर्मा (Madalsa Sharma-chakraborty) स्टारर ‘अनुपमा’ टीआरपीमध्ये झेंडे रोवत आहेत.

सुनेच्या सेटवर मिथुन चक्रवर्तींची सरप्राईज व्हिजीट, ‘अनुपमा’सोबत जुन्या आठवणींना उजाळा!  
मिथुन-अनुपमा सेट
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 3:47 PM

मुंबई : स्टार प्लसची प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ (Anupamma) ही चाहत्यांमध्ये खूपच पसंत केली जात आहे. रुपाली गांगुली (Rupali Ganguly), सुधांशु पांडे (Sudhanshu Pandey) आणि मदलसा शर्मा (Madalsa Sharma-chakraborty) स्टारर ‘अनुपमा’ टीआरपीमध्ये झेंडे रोवत आहेत. दररोज या मालिकेमध्ये येणारे नवीन ट्विस्ट चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खूप आवडतात. नुकतेच बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) हे या शोच्या सेटवर पोहोचले होते (Mithun Chakraborty surprise visit to Anupamaa set).

शोच्या कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. बर्‍याचदा कलाकारांच्या घरातील सदस्यही शोच्या सेटवर येत असतात. म्हणूनच अनुपमाच्या सेटवर सरप्राईज व्हिजीट देत मिथुन चक्रवर्ती यांनी सून मदालसा शर्मा, अभिनेत्री रुपाली गांगुली यांना खास सरप्राईज दिलं आहे.

मिथुन चक्रवर्तीबरोबर फोटो शेअर करताना रुपालीने एक खास नोट लिहिली आहे. यावेळी तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. रूपाली म्हणाली की, नायिका म्हणून तिचा पहिला चित्रपट हा मिथुन चक्रवर्ती यांच्या सोबत होता. सेटवर बाबा आणि मिथुन यांच्याकडून बराच ओरडा देखील मिळाला आहे.

चित्रपटात झळकलीय ही जोडी

मिथुन चक्रवर्ती आणि रुपाली गांगुली यांनी 1996मध्ये एकत्र काम केले होते. ही जोडी ‘अंगारा’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात दोघेही मुख्य कलाकारांच्या भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन नॅशनल अवॉर्ड विजेते फिल्ममेकर आणि रुपालीचे वडील अनिल गांगुली यांनी केले होते.

पाहा रुपालीची पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Rups (@rupaliganguly)

सुपर मॉम्सच्या सेटवर रुपालीच्या आईची उपस्थिती

रूपाली गांगुली जेव्हा आपल्या आईला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’च्या सेटवर आली होती, तेव्हा देखील ती याबद्दल बोलली होती. या शोसाठी रुपालीच्या आईने ऑडिशन दिले होते. त्या मेगा ऑडिशनपर्यंत पोहोचल्या होत्या. यामध्ये मिथुन परीक्षकाच्या भूमिकेत होते. मिथुनला त्यांचे सादरीकरण खूप आवडले होते. नृत्य सादर झाल्यानंतर मिथुनने जाऊन रुपालीच्या आईच्या पाया पडले होते. यानंतर रुपालीने मिथुनच्या पायाला स्पर्श केला आणि त्याला मिठी मारली होती.

सुनेलाही सरप्राईज

मिथुन चक्रवर्ती यांची सून मदलसा शर्मा-चक्रवर्तीही ‘अनुपमा’ मालिकेत काम करत आहेत. या शोमध्ये ती काव्याच्या भूमिकेत आहे. शोमध्ये मादालसा आणि रुपालीचे नाते तणावपूर्ण दाखवण्यात आले आहे. मराठीतील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेचा हिंदी रिमेक असून, ;अनुपमा’ असे या मालिकेचे नाव आहे.

(Mithun Chakraborty surprise visit to Anupamaa set)

हेही वाचा :

Goodbye College | आता वडिलांचं स्वप्न साकार करणार, इरफान खानचा लेक बाबिलने शिक्षणाला म्हटले ‘अलविदा’

Lookalike | सौदी अरेबियाच्या राजकुमारीसह, ‘ही’ अभिनेत्री देखील दिसते सोनम कपूरची डुप्लिकेट, पाहा फोटो

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.