AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता झोपेत कमवा 10 लाख रुपये, या कंपनीची अनोख्या नोकरीची ऑफर

या स्पर्धेत विजयी होणार्‍याला 10 लाख रुपये मिळतील. तर इंटर्नमध्ये निवड झालेल्यांना 1 लाख रुपये मिळतील. 10 लाखांचे ग्रँड प्राईज असून विजेत्याला भारताच्या स्लीप चॅम्पियनचे विजेतेपद मिळेल.

आता झोपेत कमवा 10 लाख रुपये, या कंपनीची अनोख्या नोकरीची ऑफर
आता झोपेत कमवा 10 लाख रुपये
| Updated on: Jul 02, 2021 | 5:42 PM
Share

नवी दिल्ली : पैसे मिळवणे सोपे नसते, त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. पण जर तुम्ही अशा नोकरीबद्दल सांगाल ज्यात तुम्हाला फक्त झोपेसाठी 10 लाख रुपये मिळू शकतात, तर कदाचित तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण बंगळुरूची स्लीप अँड हाउस सॉल्यूशन कंपनी वेकफिट असा एक अनोखा कार्यक्रम घेऊन आली आहे. यामध्ये लोकांना झोपायला पैसे दिले जातील. हा एक स्लीप इंटर्नशिप प्रोग्राम आहे. ज्यामध्ये निवडलेल्या स्लीप इंटर्नला लाखो कमविण्याची संधी मिळते. (Now earn Rs 10 lakh in sleep, this company’s unique job offer)

मागील सिझनच्या यशानंतर कंपनी यावर्षी या कार्यक्रमाचा दुसरा सिझन आणत आहे. यावेळी हा सिझन पूर्वीपेक्षाही अधिक खास असेल कारण मागील वेळेपेक्षा हा कार्यक्रम मोठा आणि चांगला असेल. तसेच इंटर्नची एकमेकांशी स्पर्धा होईल. येथे झोप ही नोकरीसारखे आहे, त्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतील.

60 हजार लोकांनी केला अर्ज

या स्पर्धेत विजयी होणार्‍याला 10 लाख रुपये मिळतील. तर इंटर्नमध्ये निवड झालेल्यांना 1 लाख रुपये मिळतील. 10 लाखांचे ग्रँड प्राईज असून विजेत्याला भारताच्या स्लीप चॅम्पियनचे विजेतेपद मिळेल. वार्षिक स्लीप इंटर्नशिप कार्यक्रमाच्या दुसर्‍या सिझनसाठी आतापर्यंत सुमारे 60,000 अर्जदारांनी अर्ज केले आहेत.

9 तासांची झोप आवश्यक

दुसऱ्या सिझनमध्ये कठीण निवड प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना सलग 100 रात्री 9 तास शांत झोप घ्यावी लागेल. हे काम दररोज रात्री करावे लागेल. ही त्यांची नोकरी असेल. वेकफिट कंपनी इंटर्नला झोपण्यासाठी गादी आणि एक चांगला स्लीप ट्रॅकर प्रदान केला जाईल. झोपण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी कंपनी इंटर्नसाठी झोपेचे तज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञ, गृहसजावटीचे तज्ज्ञ इत्यादींसह समुपदेशन सत्रांची सुविधा देईल.

झोपेचे महत्त्व सांगणे हाच हेतू

वेकफिटच्या सहसंस्थापकांच्या म्हणण्यानुसार वर्ष 2020 हे एक कठीण वर्ष होते. कोरोना साथीच्या रोगामुळे, ताणतणावामुळे आणि घरातून काम केल्यामुळे लोकांना उशीरा झोप लागणे, झोपेत बाधा येणे आणि कमी झोपेची समस्या पहायला मिळत आहे. हे विशेषतः 25 ते 45 वर्षे वयोगटातील प्रौढांमध्ये आहे. या झोपेच्या इंटर्नशिप प्रोग्रामच्या माध्यमातून लोकांना झोपेची प्राथमिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. (Now earn Rs 10 lakh in sleep, this company’s unique job offer)

इतर बातम्या

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

12GB-256GB, 64 MP कॅमेरासह Oppo चे दोन स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.