AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

October 2026 Rules : 1 ऑक्टोबरपासून LPG आणि ATMचे नियम बदलणार; महत्त्वाच्या वस्तू महागणार, FDबाबतही नवा नियम

उद्यापासून नवा महिना सुरु होत आहे. ऑक्टोबर 2026ला सुरुवात होत आहे. पण हा नवा महिना सुरु होताना अनेक मोठे बदल घेऊन आला आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार आहे.

October 2026 Rules : 1 ऑक्टोबरपासून LPG आणि ATMचे नियम बदलणार; महत्त्वाच्या वस्तू महागणार, FDबाबतही नवा नियम
October 2026 RulesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 5:13 PM
Share

आज सप्टेंबर २०२६चा शेवटचा दिवस आहे. आता ऑक्टोबर २०२६ सुरुवात होणार आहे. हा महिना येत असताना त्याच्यासोबत अनेक नवे बदल घेऊन येत आह. त्यामुळे या बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. यामध्ये घरगुती सिलिंडर असो किंवा एटीएममधून पैसे काढणे असो यासगळ्यामध्ये काहीना काही बदल होणार आहेत. याशिवाय 1 ऑक्टोबरपासून टीव्ही, फ्रिज आणि एसीसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही महागणार आहे.

पहिला बदल आहे तो एलपीजी गॅससंबंधी. प्रत्येप महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि गॅस कंपन्या त्यांच्या नव्या दरांचे संशोधन करुन जाहीर करतात. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून एलपीजी गॅसच्या दरांमध्येही बदल झालेले पाहायला मिळू शकतात. याशिवाय एलपीजी संबंधी कामकाजासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काही कागदपत्राची कामे असतील आणि सबसिडी गमवायची नसेल तर ही कामे करुन घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, दुसरा मोठा बदल जो 1 ऑक्टोबर पासून पाहायला मिळू शकतो तो एसबीआय बँकेसंबंधी आहे. बँकेने आता सेव्हिंग अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांना आणि सॅलरी खातं असणाऱ्या ग्राहकांना रोख रक्कम काढल्यानंतर अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात. बँक सध्या महिन्यातून चारवेळा मोफत ट्रान्झॅक्शन देते. पण त्याशिवाय अधिकवेळा तुम्ही रोख काढण्यासाठी एटीएमचा वापर करत असाल तर आता 15 रुपये आणि त्यासोबत जीएसटी भरावा लागणार आहे. दरम्यान, सॅलरी खाते असणाऱ्या ग्राहकांची फ्री लिमिट कमी करुन आता ती 10-वरुन5 करण्यात आली आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 23 रुपये आणि जीएसटी कर द्यावा लागणार आहे. नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवरही फ्री लिमिटनंतर 11 रुपये+जीएसटी लागू होणार आहे.

तिसरा बदल आहे तो इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीबाबत. कारण 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला टीव्ही, फ्रीज, एसी या सर्व वस्तूंचे दर वाढणार आहेत, याबद्दलची माहिती पीटीआयने दिली आहे. या वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल महागल्याने त्याचा फटका बसू शकतो. हे दर ८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

शेवटचा चौथा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे एफडीबद्दलचा. पण हे बदल बँक करणार आहे. तुमच्या सर्व फिक्स डिपॉझिटचे तपशिल बँकांना आता रोज सकाळी 10 वाजेपर्यंत अपडेट करावे लागणार आहेत. ही सगळी माहिती वेबसाईटवर लिस्ट करावी लागणार असल्याचे निर्देश बँकांना पाळावे लागणार आहेत.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...