Updated ITR | आतापर्यंत 1.55 लाख करदात्यांनी आयटीआर अपडेट केले, कोण भरु शकतो हा अर्ज..

| Updated on: Sep 05, 2022 | 3:07 PM

Updated ITR | नियमानुसार, थकीत करावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क आणि व्याज द्यावे लागते. अद्ययावत आयटीआर जर मुल्यांकन वर्ष संपण्यापूर्वी न केल्यास 25 टक्के शुल्क ही द्यावे लागेल. मुल्यांकन वर्षाच्या 12 महीने संपण्यापूवी ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

Updated ITR | आतापर्यंत 1.55 लाख करदात्यांनी आयटीआर अपडेट केले, कोण भरु शकतो हा अर्ज..
आयटीआरमध्ये करा दुरुस्ती
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Updated ITR | यंदा मे महिन्यापासून ते या 2 सप्टेंबर पर्यंत प्राप्तीकर रिटर्न (Income Tax Return) भरणाऱ्यांनी ते अद्ययावत केले. एकूण 1.55 लाख करदात्यांनी (Taxpayer) या मोहिमेत सहभाग घेतला. या मे महिन्यात केंद्र सरकारने या अपडेटेड आयटीआर अर्जाची सुरवात केली होती. यापूर्वी भरलेल्या आयटीआरमध्ये चूक झाली असल्यास ती दुरुस्तीची संधी या अपडेटेड आयटीआरमुळे करदात्यांना मिळाली आहे. आयटीआर-यु (IRT-U) च्या माध्यमातून हा बदल करता येतो.

शुल्क भरून दुरुस्ती

प्राप्तीकर रिटर्न अर्ज भरताना चूक होणे ही सहज गोष्ट आहे. त्यात दुरुस्तीसाठी सरकारने आयटीआर-यु (IRT-U) हा अर्ज आणला आहे. हा अर्ज भरुन आणि शुल्क अदा करुन ही दुरुस्ती करता येते. एकूण करावर हे शुल्क आकारण्यात येते.

हे सुद्धा वाचा

1.55 लाख जणांनी केली दुरुस्ती

आयकर विभागाने ट्विट करुन आईटीआर-यू विषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, आतापर्यंत म्हणजेच 2 सप्टेंबरपर्यंत 1.55 लाख करदात्यांनी अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न जमा केले आहे.

दोन वर्षांपूवीचाही दाखला

प्राप्तीकर खात्याच्या माहितीनुसार, 20,000 करदात्यांनी 2020-21 आणि 2021-22 या दोन मुल्यांकन आर्थिक वर्षांसाठी प्राप्तीकर रिर्टन अर्ज भरताना ज्या चूका केल्या होत्या. त्या दुरुस्त केल्या आहेत. त्यांनी अपडेटेड आयटीआर जमा केला आहे.

यंदाच सुविधा

प्राप्तिकर खात्याच्या माहितीनुसार, सरकारने दुरुस्तीची ही तरतूद यंदा सुरु केली आहे. वित्त कायदा 2022 मधे केंद्र सरकारने नवीन तरतूद केली. त्यात सेक्शन 139(8ए) अंतर्गत आयटीआर-यु भरण्याची सुविधा देण्यात आली.

कोण भरू शकते आईटीआर-यू

ज्या करदात्यांना त्यांच्या चूका दुरुस्त करायच्या आहेत. प्राप्तीकर रिटर्नमध्ये बदल करायचा आहे. त्यांनी चुकीची आर्थिक माहिती द्यायची आहे. काही आर्थिक माहिती दिली नसल्यास हा अर्ज भरता येतो.

किती शुल्क द्यावे लागेल

नियमानुसार, थकीत करावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क आणि व्याज द्यावे लागते. अद्ययावत आयटीआर जर मुल्यांकन वर्ष संपण्यापूर्वी न केल्यास 25 टक्के शुल्क ही द्यावे लागेल. मुल्यांकन वर्षाच्या 12 महीने संपण्यापूवी ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

तर शुल्क दुप्पट

जर तुम्ही मुल्यांकन वर्षाच्या 12 महीन्यात ही दुरुस्ती केली नाहीतर तुम्हाला 24 महिन्यांचे शुल्क द्यावे लागेल. म्हणजेच अतिरिक्त शुल्क 50 टक्के द्यावे लागेल. 2019-20 आणि 2020-21 या वर्षांसाठी आईटीआर-यू अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे.