AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Return | ITR-U मधून सरकाने कमावले 28 कोटी, इतक्या करदात्यांनी अपडेट केली माहिती

Income Tax Return | 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत 1 लाख करदात्यांनी ITR-U (अपडेट केलेले) अर्ज भरला आहे. परिणामी सरकारची कोट्यवधींची कमाई झाली आहे.

Income Tax Return | ITR-U मधून सरकाने कमावले 28 कोटी, इतक्या करदात्यांनी अपडेट केली माहिती
सरकारची कमाईImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 27, 2022 | 9:00 AM
Share

Income Tax Return | यावेळी प्राप्तीकर भरण्यासाठी सर्वाधिक प्रचार आणि प्रसार झाला. युद्धपातळीवर सर्वच माध्यमांनी करदात्यांना अलर्ट केले. तरीही अनेकांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्ज भरण्यात आळस केला नी शेवटच्या दिवसात भागम भाग केली. तरीही काहींना अर्ज भरता आले नाही. ते आता दंडासहित आयटीआर (Income Tax Return) जमा करत आहेत. तर अर्जात बदल करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) अर्थसंकल्पात (Budget) विशेष बाब म्हणून तरतूद केली होती. त्याचा ही अनेक करदात्यांनी फायदा उचलला तर त्यामाध्यमातून सरकारने ही कमाई केली. आतापर्यंत 1 लाखांहून अधिक करदात्यांनी (Taxpayer) ITR-U फॉर्म भरला आहे, ज्यामुळे केंद्र सरकारला अतिरिक्त 28 कोटी रुपयांची कमाई करता आली. या नवीन तरतुदींमुळे करदात्यांना अद्ययावत माहिती भरणे सूलभ झाले आहे. उत्पन्नाचा तपशील नव्याने दिल्याने पुढील नाहक होणाऱ्या त्रासापासून करदात्यांची आपोआप सूटका होते.

ITR-U फॉर्म

हा नवीन ITR अर्ज आहे, याला ITR-Updated असेही म्हणतात. ज्या करदात्यांना त्यांच्या ITR मध्ये काही बदल करण्याची गरज वाटते, ते ITR-U अर्ज (ITR-Updated) जमा करतात. या आर्थिक वर्षात लाखो करदात्यांनी ITR-U भरले आहे, ज्यामुळे सरकारला भरपूर उत्पन्न मिळाले आहे. ITR-U अर्जाचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आला होता.

विसंगती टाळता येते

जर करदात्याच्या ITR मध्ये काही विसंगती असेल, त्रुटी असतील तर करदात्याला ITR-U अर्ज भरून ती त्रुटी सुधारता येते. पण त्रुटी कायम राहिल्यास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ करदात्याविरुद्ध कार्यवाही करु शकते. पण त्रुटी सुधारल्यास CBDT ला कार्यवाही करता येत नाही. करदात्यांना 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांसाठी ITR-U फॉर्म भरण्याची सुविधा दिली जात आहे आणि या अर्जासाठी मूल्यांकन वर्षे 2020-21 आणि 2021-22 हे आहे.

ITR-U अर्ज गरज कशाला?

आयटीआर-यू फॉर्म मूल्यांकन वर्षाच्या 2 वर्षांच्या आत भरणे आवश्यक आहे. या अर्जाद्वारे, ITR मधील उत्पन्न अपडेट केले जाते आणि असे तुम्ही का करत आहात याची माहिती विभागाला द्यावी लागते. त्यामुळे कार्यवाहीचा नाहकचा ससेमीरा टळतो.

लॉटरी, सट्टा खेळणाऱ्यांनाही सुविधा

ITR-U अर्ज भरण्यासाठी सुविधा लॉटरी, सट्टा खेळणाऱ्यांनाही मिळते, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन गेम, लॉटरी आणि सट्टेबाजीतून कमाई करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाची माहिती अद्ययावत केल्यास संभाव्य कारवाईची भीती राहत नाही. त्यांच्यावर कुठलाही दंड अथवा कायदेने विहीत कारवाई होत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांनी वेळेच्या वेळी उत्पन्नासंदर्भातील माहिती या अर्जाद्वारे अपडेट करणे त्यांच्यासाठी फायदेचे ठरेल.

कोट्यवधींचा परतावा

सीबीडीटीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 93 हजार कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. गतवर्षी याच कालावधीत 52 हजार कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परताव्यात 78 टक्के वाढ झाली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.