कोण म्हणते सरकारने रोजगार दिला नाही ? तब्बल 8.25 लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा केंद्राचा दावा

| Updated on: Apr 20, 2022 | 8:12 AM

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2008 मध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू झाल्यानंतर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने एखाद्या आर्थिक वर्षात एक लाखांहून अधिक नवीन युनिट्सची स्थापना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 8.25 लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

कोण म्हणते सरकारने रोजगार दिला नाही ? तब्बल 8.25 लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा केंद्राचा दावा
नोकरी जाण्याची भीती?
Follow us on

मुंबई : केंद्र सरकार महागाई आटोक्यात आणण्यात आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात सपशेल फेल ठरल्याचा हल्लाबोल विरोधक करत असताना गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत (PMEGP) 8.25 लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसह 1.03 लाख नवीन उत्पादन आणि सेवा युनिट्स ची स्थापना करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. ” गेल्या वर्षाच्या तुलनेत तसेच वर्ष 2020-21 च्या तुलनेत, PMEGP अंतर्गत तयार केलेल्या युनिट्स आणि रोजगाराची संख्या प्रत्येकी 39 टक्क्यांनी वाढली आहे, तर मार्जिन मनी डिस्ट्रिब्युशन (subsidy) मध्ये देखील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे,” असे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (Ministry of Micro, Small and Medium Enterprises) प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. . 2008 मध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू झाल्यानंतर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) आर्थिक वर्षात एक लाखांहून अधिक नवीन युनिट्सची स्थापना करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा ही मंत्रालयाने केला आहे.

12 हजार कोटींचा निधी

देशात स्थापन झालेली 1 लाख 3 हजार 219 नवीन उत्पादन आणि सेवा युनिट्स स्थापन्यासाठी 12 हजार कोटींचे भांडवल लागले. त्यापैकी केव्हीआयसीने 2,978 कोटी रुपयांचा मार्जिन मनी अनुदान वितरित केले आहे, तर बँक पतपुरवठ्याद्वारे सुमारे 9 हजार कोटी रुपये उभारण्यात आले आहे. 2008 नंतर विचार करता गेल्या आर्थिक वर्षात केव्हीआयसीने दिलेले 2,978 कोटी रुपयांचा मार्जिन मनी अनुदान आतापर्यंतचे सर्वाधिक मोठे अनुदान ठरले आहे. या आश्वासक घडामोडींमुळे देशभरात तब्बल 8,25,752 नवीन रोजगार निर्माण झाले आहेत, जे पीएमईजीपीच्या अंतर्गत आतापर्यंतची सर्वाधिक रोजगार निर्मिती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एकंदरीत, 2014-15 पासून पीएमईजीपी अंतर्गत स्थापन केलेल्या युनिट्सची संख्या 114 टक्क्यांनी वाढली आहे, रोजगार निर्मितीत 131 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि मार्जिन मनी वितरणात 2021-22 मध्ये 165 टक्क्यांची वाढ झाली आहे.स्थानिक उत्पादन क्षेत्रात मेक इन इंडियाचा आणि स्वावलंबनचा मंत्र दिल्याने रोजगार निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे श्रेय पंतप्रधानांना असल्याचे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनई कुमार सक्सेना यांनी सांगितले.

कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादन आणि स्वयंरोजगारावर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे हा चमत्कार घडला आहे. मोठ्या संख्येने तरुण, महिला आणि स्थलांतरितांना पीएमईजीपी अंतर्गत स्वयंरोजगार उपक्रम राबविण्यास उद्युक्त करण्यात आल्याचे सक्सेना यांनी म्हटले आहे.

संबंधीत बातम्या :

ब्रेकिंग! महाराष्ट्र पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता, केंद्राचं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र, पत्रात काय?

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचा काँग्रेससाठी नवा फॉर्म्युला, रोडमॅपमुळे काँग्रेसचे कमबॅक होणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

LIC IPO : आयपीओची तारीख पे तारीख संपणार, चालू आठवड्यात मोठ्या घोषणेची शक्यता