LIC IPO : आयपीओची तारीख पे तारीख संपणार, चालू आठवड्यात मोठ्या घोषणेची शक्यता

एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलआयसी आयपीओ तारखेची (LIC IPO DATE) अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. एलआयसी आयपीओ यशस्वी बनविण्यासाठी केंद्राचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

LIC IPO : आयपीओची तारीख पे तारीख संपणार, चालू आठवड्यात मोठ्या घोषणेची शक्यता
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 7:02 AM

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) बहुप्रतीक्षीत आयपीओ (LIC IPO) बाबत महत्वाची घोषणा चालू आठवड्यात होण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलआयसी आयपीओ तारखेची (LIC IPO DATE) अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. एलआयसी आयपीओ यशस्वी बनविण्यासाठी केंद्राचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अँकर गुंतवणुकदारांना (ANCHOR INVESTOR) केंद्रानं निमंत्रण धाडली आहेत. सरकारने अबूधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरेटी, जीआयसी, कॅनडाचे तीन पेन्शन फंड आणि कतार इन्व्हेस्टमेंट ऑथोरेटी आदींचा यादीत समावेश आहे. सरकारने एलआयसी आयपीओ साठी 50-60 अँकर इन्व्हेस्टर्सची निवड केली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओबाबत केंद्र सरकार आणि गुंतवणूकदार बँकर्सची बैठकीच्या फेऱ्या सुरू आहेत.

प्राईस बँड ते मार्केट वॅल्यू

आयपीओचा प्राईस बँड 1,550 ते 1,700 रुपये प्रति शेअर दरम्यान असू शकतो. एलआयसी आयपीओतून केंद्र 63 हजार कोटी ते 65 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे. एलआयसी आयपीओचा विस्तार सरकार 31.62 कोटींवरून 38 कोटी शेअर्सपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. एलआयसी आयपीओमधील 6 टक्क्यांहून अधिक हिस्सा विकण्याचा सरकारचा विचार नाही. एलआयसी आयपीओचा आकार सरकार 31.62 कोटींवरून 38 कोटी शेअर्सपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी डीआरएचपी अर्थात आयपीओचा प्रस्ताव एलआयसीने सेबीकडे 13 फेब्रुवारी रोजी सादर केला होता.

तारीख पे तारीख

‘आयपीओ’शी संबंधित सुधारित कागदपत्रे सादर झाल्यानंतर 12 मेपर्यंत हा आयपीओ यादीत सुचीबद्ध होऊ शकतो. या महिन्याच्या अखेरीस आयपीओ येण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा आयपीओ मार्च 2022 अखेर येणार होता. सरकारला या आयपीओ विषयक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीची शेअर बाजारात 12 मेपर्यंत सूचीबद्ध होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक आर्थिक निकालांना मंजुरी दिल्यानंतर कंपनीचे मंडळ भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला सूचित करेल, असे सूत्रांनी सांगितले. यानंतर आयपीओची सुधारित कागदपत्रे सादर केली जाणार आहेत.

निर्गुंतवणुकीचं मेगा बजेट

गेल्या आर्थिक वर्षात 78 हजार कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले होते. त्यासाठी आयुर्विमा कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकून 63 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची तयारी होती. डीआरएचपी अर्थात आयपीओचा प्रस्ताव एलआयसीने सेबीकडे 13 फेब्रुवारी रोजी सादर केला होता. एलआयसीकडे सध्याच्य स्थितीत 28.3 कोटी विमा पॉलिसी आहेत आणि 13.5 लाख प्रतिनिधी अर्थात एजंटचे जाळे आहे.

संबंधित बातम्या

today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाचे दर वाढले, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे दर

SHARE MARKET: सेन्सेक्स 700 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांचा पाय खोलात, 2 दिवसांत 6 लाख कोटींवर पाणी

Bank Merger : विलिनीकरणाचा उत्साह मावळला, एचडीएफसी गुंतवणुकदार तोट्यात; 9 दिवसात 2 लाख कोटींवर पाणी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.