today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाचे दर वाढले, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे दर

today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाचे दर वाढले, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे दर
आजचे इंधन दर
Image Credit source: twitter

देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol diesel price) स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग पंधरावा दिवस आहे, गेल्या पंधरा दिवसांपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

अजय देशपांडे

|

Apr 20, 2022 | 6:46 AM

नवी दिल्ली :  देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol diesel price) स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग पंधरावा दिवस आहे, गेल्या पंधरा दिवसांपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर (Crude oil price)वाढू लागले आहेत. मात्र भारतात पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel rate today) स्थिर आहेत. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये मोठी भाववाढ पहायला मिळाली होती. या काळात इंधनाचे दर प्रति लिटर दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले. मात्र त्यानंतर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये लिटर आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेल प्रति लिटर 104.77 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलसाठी 99.83 रुपये मोजावे लागत आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

आज पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या दरानुसार राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणाताही बदल करण्यात आलेला नाही. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.15 तर डिझेलचा दर 104.40 रुपये लिटर आहे. पुण्यात देखील पेट्रोल 120 रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 120.51 रुपये लिटर असून, डिझेलचा दर 104.77 रुपये लिटर आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.15 आणि 102.89 रुपये लिटर आहे. तर राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळत असून, परभणीत पेट्रोल दर प्रति लिटर 123.53 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 106.10 रुपये प्रति लिटर इतका आहे.

पेट्रोल दराचा चेंडू राज्याकडे

सध्या पेट्रोल, डिझेल आणि इतर सर्वच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाचे दर कमी कधी होणार असा सवाल आता केला जात आहे. तसेच केंद्र सरकार पुन्हा एकदा एक्साईज ड्यूटी कमी करणार का याकडे देखील सर्वांचे लक्षा लागले आहे. मात्र यावर उत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केंद्राचा कर कमी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. केंद्राने कर कमी केला आहे. आता राज्यांनी देखील व्हॅट कमी करावा, त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होतील असे केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

SHARE MARKET: सेन्सेक्स 700 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांचा पाय खोलात, 2 दिवसांत 6 लाख कोटींवर पाणी

Mukesh Ambani Birthday: अंबानींचं रिटर्न गिफ्ट! 65वा वाढदिवस 63 हजार कोटींचा नफा, रिलायन्स शेअर्स टॉपला

Bank Merger : विलिनीकरणाचा उत्साह मावळला, एचडीएफसी गुंतवणुकदार तोट्यात; 9 दिवसात 2 लाख कोटींवर पाणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें