वृद्धापकाळातील पेन्शनचं टेन्शन घेताय, अजिबात घेऊ नका; कारण मॅक्स लाइफ देणार तुम्हाला आजीवन पेन्शन योजना, जाणून घ्या काय आहे योजना

| Updated on: Mar 19, 2022 | 12:24 AM

या योजनेबद्दल विमा कंपनी म्हणते की हे अ‍ॅन्युइटी उत्पादन आरओपी प्रकारांसाठी पाच वर्षांतून एकदाच जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी परवानगी देते. तसेच या योजनेतील पॉलिसीधारक इतर सेवांसोबत नावनोंदणी आणि पत्ता बदलण्याची किंवा अपडेट करण्याची विनंती करू शकतात.

वृद्धापकाळातील पेन्शनचं टेन्शन घेताय, अजिबात घेऊ नका; कारण मॅक्स लाइफ देणार तुम्हाला आजीवन पेन्शन योजना, जाणून घ्या काय आहे योजना
Pension
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीची (Max Life Insurance Company) मॅक्स लाइफ स्मार्ट गॅरंटीड पेन्शन योजना (Max Life Smart Guaranteed Pension Plan) ही एक उत्तम योजना आहे. ही एक नॉन-लिंक केलेली, नॉन-पार्टिसिपेटिंग सिंगल, प्रीमियम इंडिविजुअल/ग्रुप जनरल वार्षिकी योजना आहे. या योजनेमुळेच कंपनीचा असा दावा आहे की नवीन उत्पादन ऑफर पॉलिसीधारकांची भविष्यातील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची हमी देणारी आहे. स्मार्ट गॅरंटीड पेन्शन योजनेद्वारे कंपनीने ग्रुप अॅन्युइटी सोल्युशन क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्राहकांना या पॉलिसीचे अनेक फायदे आहेत. याबाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार ​​आहोत.

कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समूह वार्षिक उत्पादन म्हणून ही योजना थेट खरेदी करू शकतात. याशिवाय हे उत्पादन थेट ग्राहकांनाही उपलब्ध होणार आहे.

NPS सदस्य देखील योजना खरेदी करा

या योजनेसाठी कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, आकर्षक अ‍ॅन्युइटी दर आणि अद्वितीय फायद्यांची ऑफर देऊन, नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System- NPS)  यामधील ग्राहक त्यांच्या NPS उत्पन्नाचा वापर करून उत्पादन खरेदी करण्यासदेखील पात्र असणार आहेत.

मॅक्स लाइफ स्मार्ट गॅरंटीड पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

  1. पॉलिसीधारकाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आजीवन उत्पन्नाची हमी मिळते.
  2. रिटर्न ऑफ प्रीमियम (ROP) पर्याय जो वर्षानंतर व मृत्यूनंतर जो वारस असतो किंवा कायदेशीररित्या असणाऱ्या वारसाला पूर्ण खरेदीच्या किंमतीसह तो परत केला जातो.
  3. अ‍ॅडव्हान्स अ‍ॅन्युइटी ऑप्शन सुविधा जी ग्राहकांची आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत करते. ही सुविधा फक्त आरओपी व्हेरियंटसह जॉइंट लाईफ इमिडिएट अ‍ॅन्युइटीमध्येच उपलब्ध आहे. या सुविधांसह, ज्याचा मृत्यू झालेला असतो त्याच्या वारसाला पहिल्या वर्षांनंतर मिळू शकते.
  4. या योजनेतील अमर्यादित टॉप-अप सुविधा आहे जी महागाईवर मात करण्यासाठी आणि एखाद्याचे वार्षिक उत्पन्न सुधारण्यासाठीही मदत करत असते.

जीवन प्रमाणपत्र 5 वर्षातून एकदाच सादर करावे लागेल

या योजनेबद्दल विमा कंपनी म्हणते की हे अ‍ॅन्युइटी उत्पादन आरओपी प्रकारांसाठी पाच वर्षांतून एकदाच जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्यासाठी परवानगी देते. तसेच या योजनेतील पॉलिसीधारक इतर सेवांसोबत नावनोंदणी आणि पत्ता बदलण्याची किंवा अपडेट करण्याची विनंती करू शकतात.

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) मॅक्स लाईफला अलीकडेच पेन्शन फंड व्यवस्थापनासाठी उपकंपनी स्थापन करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

तुमचा आपत्कालीन निधी आहे तर या चुका टाळा; नाही तर मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार

होळीच्या रंगातून तुम्ही शिकू शिकता गुंतवणुकीचे धडे; गुंतवणुकीचे हे धडे शिकलात तर तुमचे आयुष्य कधीच बेरंगी होणार नाही

आता UPI वापरण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही; बँकांनाही देण्यात आल्या होत्या सूचना; काय आहेत UPI चे तपशील वाचा