होळीच्या रंगातून तुम्ही शिकू शिकता गुंतवणुकीचे धडे; गुंतवणुकीचे हे धडे शिकलात तर तुमचे आयुष्य कधीच बेरंगी होणार नाही

होळीच्या रंगातून तुम्ही शिकू शिकता गुंतवणुकीचे धडे; गुंतवणुकीचे हे धडे शिकलात तर तुमचे आयुष्य कधीच बेरंगी होणार नाही
Holi Rang
Image Credit source: TV9

होळीच्या सणामध्ये ज्या प्रकारे एकाच प्लेटमध्ये अनेक रंग भरुन ठेवलेले असतात, त्याच प्रकारच्या गुंतवणुकीच्याही काही गोष्टी असतात. प्लेटमध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे रंग असतात त्याच प्रकारे गुंतवणुकीचेही पर्याय असणे गरजेचे असतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 18, 2022 | 7:16 PM

मुंबईः होळी हा सण मौजमजेचा, आनंदाचा सण. पण होळी आणि गुंतवणूक (investment) या दोन्ही गोष्टी एकत्रच केल्या तर त्या आनंदाला आणखी चार चाँद लागतात. हा सण अजब यासाठी आहे आहे की यामध्ये अनेक गोष्टींचा मेळ घातला जातो. सत्य हे आहे की या सणाची गोष्ट विचित्र असली तरीही ती प्रभावी आहे.आणि हीच खरी या सणांची खासियत आहे. ते तुम्हाला तुमच्या काही गोष्टी या धडे शिकवण्यासाठी येतात तर काही गोष्टी चांगल्या धडे शिकायला मिळतात आणि भविष्यातही (Future) तुमचे आयुष्य एखाद्या सणासारखे ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणूनच आयुष्यात काही धडे सणांच्या मागे दडलेल्या गोष्टीतून शिकायचे असतात. या धड्यांबद्दल आणि शिकवणींबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती की आपण त्यांना जीवनाच्या प्रत्येक भागात सहजपणे लागू करू शकतो. मग ते समाजात बंधुभाव वाढवण्यासाठी असो किंवा आपली संपत्ती वाढवण्यासाठी असो. ICICI बँक (Bank) आणि बाजार तज्ञांद्वारे, होळीच्या निमित्ताने गुंतवणुकीच्या युक्त्या कशा शिकता येतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

होळी हा अनेक रंगांचा सण

होळीच्या सणामध्ये ज्या प्रकारे एकाच प्लेटमध्ये अनेक रंग भरुन ठेवलेले असतात, त्याच प्रकारच्या गुंतवणुकीच्याही काही गोष्टी असतात. प्लेटमध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे रंग असतात त्याच प्रकारे गुंतवणुकीचेही पर्याय असणे गरजेचे असतात. गुंतवणुकीचे पर्याय अधिक असतील तर सणातील उत्सवाचा आनंद अधिक द्विगुणित होतो. सगळीच गुंतवणूक एका रंगासारख्या एकाच पर्यायात गुंतवणे योग्य नाही.

वयोगटानुसार साजरी

होळी हा एकमेव सण असा आहे की, वेगवेगळ्या वयोगटानुसार आपापल्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. होळीमध्ये लहान मुले वेगळा खेळ खेळतात, तर तरुण आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हा सण साजरा करतात. त्यामुळे होळी साजरी करण्याची पद्धत ही वयोमानानुसार बदलते हेच सिद्ध होते. त्यामुळे या सणावरुनच तुम्ही गुंतवणुकीचे सुत्रही अवलंबू शकता. मनुष्याचे जसजसे वय वाढत जाते, तसतसे जोखीम आणि गोंधळ कमी होतो त्यामुळे सण किंवा गुंतवणूकीचा पुरेपूर आनंद घेता येतो. गुंतवणुकीच्या वेळी तरुणाई शांत बसली तर गुंतवणुकीचा उद्देश पूर्ण होणार नाही तर त्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिकांनी जोखीम पत्करली तर धांदल मात्र नक्की उडणार.

रंगांसारखेच गुंतवणुकीचे फायदे

होळीचा आनंद तुम्हाला पाहिजे तसा घेता येतो, पण कधी तुम्ही जर होळी साजरा करताना सुरक्षितता बाळगली तर. होळीमध्ये रंगांचा वापर प्रचंड केला जातो. त्यामध्ये कृत्रिम आणि नैसर्गिक रंगही वापरले जातात. त्यामुळे तुम्ही जर होळी सुरक्षित खेळू पाहत असाल तर त्यासाठी नैसर्गिक रंग वापरा म्हणजे त्याचे कोणतेही तुम्हालाही साईडइफेक्ट होणार नाहीत. या रंगांसारखेच तुमच्या गुंतवणुकीचे फायदे आहेत. त्यामुळे व्ही. एम. फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विवेक मित्तल यांनीही गुंतवणुकीबाबत सुरक्षेशी संबंधित विचार करणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. मग ते गुंतवणुकीचे पर्याय निवडणे असो किंवा बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार स्वत:ला तयार करणे असो. जर गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय ओळखू शकतो आणि बदलत्या परिस्थिती समजून घेऊ शकतो, तर तो गुंतवणुकीचा पूर्ण आनंद घेऊ शकतो.

नातं आणि गुंतवणूक

होळी सण ज्या वेळी खेळला जातो, त्यावेळी ती मोठ्या आनंदात आणि उत्सावात साजरी केली जाते. त्यामुळे आता होळी खेळली जाताना कुटुंबीयांसोबतही अनेकदा खेळली जाते. होळी कुठे दिवसा खेळली जाते तर कुठे रात्रीही खेळली जाते. या होळीप्रमाणेच आपण करत असलेली गुंतवणूकही अशीच असतो. त्यासाठी वेळही आवश्यक असतो. ज्याप्रमाणे नात्याला आपण वेळ देतो त्याचप्रमाणे गुंतवणुकीलाही वेळ द्यावा लागतो तरच ती गुंतवणुकही नात्याप्रमाणे फुलते. योग्य गुंतवणूक केल्यास सण मोठ्या उत्साहात साजरे होतात आणि समृद्धीही आपल्याला मिळते.

संबंधित बातम्या

Kashmir filesमधील तथ्य चुकीची, मुस्लिम आणि शिखांचं बलिदान विसरले; ओमर अब्दुल्ला कडाडले

गुलाम नबी आझाद सोनिया गांधीच्या भेटीला! 5 राज्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

संजय राऊतांसह 6 खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार, यादीत राज्यातल्या बड्या नेत्यांची नावं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें