Pensioners Portal: निवृत्ती वेतनधारकांसाठी सरकारचे नवे पोर्टल, मिळणार ‘या’ विशेष सुविधा

पेन्शनधारकांच्या सोयीसाठी सरकारने नवी सुविधा सुरू केली आहे. पेन्शनसंबंधित सर्व माहिती आता एकाच साईटवर उपलब्ध असणार आहे .

Pensioners Portal: निवृत्ती वेतनधारकांसाठी सरकारचे नवे पोर्टल, मिळणार या विशेष सुविधा
पेन्शनर्स पोर्टल
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 19, 2022 | 10:47 PM

नवी दिल्ली,  तुम्ही पेन्शनधारक (Pensioners Portal) असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने पेन्शनधारकांच्या सोयीसाठी एक नवे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या मदतीने पेन्शनधारक त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने हे केले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी युनिफाइड पोर्टल लाँच केले.

पेन्शनधारकांसाठी घोषणा

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी एक एकीकृत पोर्टल सुरू केले. https://ipension.nic.in/ या वेबसाइटवर पेन्शनधारकांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल. हे पोर्टल सुरू करण्याचा उद्देश निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविणे हे आहे.

या सुविधा होणार आहेत उपलब्ध

या पोर्टलवर ‘भविष्य’ची लिंक आहे. ज्यामध्ये पेन्शनधारकांची थकबाकी आणि केंद्रीकृत पेन्शन तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीची माहिती उपलब्ध असेल. पोर्टलवर ‘अभिनव’ची लिंकही आहे. ज्यामध्ये निवृत्त अधिकारी त्यांचे रेकॉर्ड तपासू  शकतात. या पोर्टलवर पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांची माहिती उपलब्ध असेल.

तिसरे सर्वोत्तम पोर्टल

नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी असेसमेंटला सरकारच्या सर्व सेवा पोर्टल्समध्ये तिसरे सर्वोत्तम पोर्टल म्हणून दर्जा देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, 1,74,000 हून अधिक प्रकरणांवर प्रक्रिया करण्यात आली.  ज्यामध्ये एक लाखाहून अधिक ई-पीपीओचा समावेश आहे.