AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेच्या खात्यातून एकदाच 12 रुपये कट होतील पण तुम्हाला मिळेल दोन लाखांचा इन्शुरन्स, जाणून घ्या योजना

PMSBY | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY ) हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये एकदाच माफक प्रीमियम भरून तुम्हाला विमा मिळतो. PMSBY अवघ्या 12 रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाखांचा कव्हर मिळतो.

बँकेच्या खात्यातून एकदाच 12 रुपये कट होतील पण तुम्हाला मिळेल दोन लाखांचा इन्शुरन्स, जाणून घ्या योजना
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 10:00 AM
Share

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे लोक कधी नव्हे एवढे आरोग्याविषयी सजग झाले आहेत. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स (Insurance), मेडिक्लेम आणि इतर आरोग्यविषयक उत्पादने आणि सेवांची मागणी वाढली आहे. सध्याचा बिकट काळ पाहता अनेकजण आरोग्य विमा उतरवून घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, विमा उतरवून घेणे ही प्रत्येकालाच परवडणारी गोष्ट नाही.

अशा लोकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY ) हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये एकदाच माफक प्रीमियम भरून तुम्हाला विमा मिळतो. PMSBY अवघ्या 12 रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाखांचा कव्हर मिळतो.

मे महिन्यात प्रीमियमची रक्कम कापली जाते

केंद्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी PMSBY योजना सुरु केली होती. या योजनेतील 12 रुपयांचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यामधून कापला जातो. 31 मे रोजी प्रीमियमची रक्कम वसूल केली जाते.

18 ते 70 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला PMSBY योजनेचा लाभ मिळतो. ही पॉलिसी खरेदी करताना तुमचे बँक खाते PMSBY योजनेशी लिंक करण्यात येते. पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा अपघातात अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांची रक्कम अदा केली जाते. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन PMSBY योजनेसाठी अर्ज करु शकता. याशिवाय, अनेक सरकारी आणि खासगी विमा कंपन्याही PMSBY इन्शुरन्स पॉलिसी विकतात.

नोकरदारांना 7 लाखांचा मोफत विमा

कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. नोकऱ्या कशाबशा वाचलेले कर्मचारीही वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा सुरु केल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे एम्पॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Scheme). या योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विम्याची रक्कम सहा लाखावरुन सात लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.

खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. EPFO च्या सर्व सदस्यांना हा विमा लागू असतो. यापूर्वी या विमा योजनेची रक्कम 6 लाख रुपये होती. मात्र, गेल्यावर्षी तत्कालीन केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी ही मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

EDLI Scheme विम्याचे पैसे संबंधित नोकरदाराच्या वारसदाराला मिळतात. एखाद्या कर्मचाऱ्याचा आजारपण किंवा दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम वारसदाराला मिळू शकते. EDLI Scheme साठी नोकरदारांना कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. हे पैसे कंपनीकडून अदा केले जातात. नोकरदारांच्या पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होते. तेवढीच रक्कम कंपनीकडूनही भरली जाते. या 12 टक्के रक्कमेपैकी 8 टक्के पैसे EPS तर 3.66 टक्के पैसे EPF मध्ये जातात. तर EDLI Scheme साठी फक्त कंपनीलाच प्रीमियम भरावा लागतो.

संबंधित बातम्या:

PHOTO | एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी : मासिक 3810 रुपये रक्कम जमा केल्यास मिळतील 27 लाख रुपये, जाणून घ्या कसे

PHOTO | Bank Alert : तुमचे ‘या’ बँकेत खाते आहे का? मग 1 ऑक्टोबरपूर्वी करा हे काम, ऑनलाईनही करू शकता अर्ज

Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.