Post Office FD: पोस्ट खात्यातील या योजनेतील गुंतवणुकीने व्हाल मालामाल, बँकेतील गुंतवणुकीपेक्षा मिळेल जास्त फायदा

| Updated on: Jun 11, 2022 | 8:22 PM

टपाल कार्यालयाच्या योजनेतंर्गत अनेक प्रकारच्या गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. अनेक गुंतवणुकदार दीर्घकालीन मुदत ठेवीचा पर्याय गुंतवणुकीसाठी निवडतात. तुम्हाला ही हा पर्याय योग्य वाटत असेल तर पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत तुम्हाला गुंतवणुकीची संधी मालामाल केल्याशिवाय राहणार नाही.

Post Office FD: पोस्ट खात्यातील या योजनेतील गुंतवणुकीने व्हाल मालामाल, बँकेतील गुंतवणुकीपेक्षा मिळेल जास्त फायदा
टपाल खात्यातील गुंतवणूक करेल मालामाल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Post Office Fixed Deposit: वाढत्या महागाईत गुंतवणुकदार (Investor) चोखंदळ झाला आहे. त्याची गुंतवणुकीविषयीची समज वाढली आहे. आजकाल गुंतवणुकदारांचा बँकेपेक्षा टपाल कार्यालयतील (Post Office) योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढत आहे. बँकेत जमा रक्कम पुर्णतः सुरक्षित नसते. कारण एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर, ग्राहकांनी मोठया मेहनतीने कमाई करुन जमा केलेली रक्कम एका दिवसात बुडून जाते. परंतू, पोस्ट खात्यातील गुंतवणुकीला सरकारचे अभय मिळते. या गुतवणुकीला सरकारचे संरक्षण लाभते. पोस्ट खात्यातंर्गत गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत. सध्या अनेक लोक दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. जर तुम्हीही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करु इच्छिता तर मुदत ठेव (Fixed Deposit) योजनेत गुंतवणूक हा चांगला पर्याय ठरु शकतो. पोस्ट खात्यातील फिक्स डिपॉजिट योजनेतील गुंतवणूक ग्राहकांना मालामाल करु शकते. चला तर जाणून घेऊयात या योजनेविषयी.

व्याजच नाही तर अनेक सुविधा

पोस्ट खात्यात एफडी केल्यास ग्राहकाला व्याजासह अनेक इतर सुविधा ही मिळतील. यामध्ये चांगल्या परताव्या सोबतच ग्राहकाला संपूर्ण रक्कमेवर सरकारकडून संरक्षणाची हमी मिळते. या योजनेत तिमाही आधारावर व्याजाची सुविधा मिळते. पोस्ट खात्यात एफडी योजनेत गुंतवणूक करणे आणि त्यासंबंधीचे खाते उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. टपाल खात्यात ग्राहक 1,2,3 आणि 5 या वर्षांकरीता मुदत ठेवीत ठेव ठेऊ शकते.

हे सुद्धा वाचा

मुदत ठेवीवर मिळेल चांगले व्याज

बँकांच्या तुलनेत पोस्ट खात्यातील एफडीवर चांगले व्याज मिळते. टपाल खात्यात 7 दिवसांपासून ते एक वर्षांपर्यंतची एफडी काढता येते. या मुदत ठेवीवर ग्राहकाला 5.50 टक्के दराने व्याज मिळते. एक वर्ष एक दिवस ते 2 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवरही इतकेच व्याज मिळते. याव्यतिरिक्त 3 वर्षापर्यंतच्या एफडीवर 5.50 टक्के दराने व्याज मिळेल. तर 3 ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.70 टक्के दराने व्याज मिळेल.

असा फायदा मिळेल कुठे

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेचे व्याजदर 5.50% ते 6.70% पर्यंत आहेत.पोस्ट ऑफिसकडून देण्यात येणाऱ्या एफडी योजनांची यूएसपी म्हणजे ही एक सरकारी योजना असून त्याचे व्याजदर दर तिमाहीला बदलले जातात. मात्र, बँकांच्या मुदत ठेवींच्या बाबतीत असा कोणताही नियम नाही. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमधून बँकांचे एफडी दर कमी होतात किंवा वाढतात. बँकांच्या मुदत ठेवीवर त्याचा परिणाम दिसून येतो. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमधून बँकांचे एफडी दर कमी होतात किंवा वाढतात. एक हुशार गुंतवणुकदार तोच ठरतो, जो गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांचा विचार करून त्यानंतरच रक्कम गुंतवितो.

गुंतवणूक भारी, रक्कमेची हमी

भारत सरकारकडून एफडीवर संरक्षणाची हमी
गुंतवणुकदारांची रक्कम पूर्णतः राहते सुरक्षित
तुम्ही एकाहून अधिक मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु शकता
एफडी खाते संयुक्तरित्या काढू शकता
मुदत ठेव ही एका टपाल खात्यातून दुस-या टपाल खात्यात हस्तांतरीत करु शकता
एफडी ऑफलाईन(नगद,धनादेश) वा ऑनलाईन (नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग) काढता येते
पाच वर्षांच्या एफडीतील गुंतवणूक तुम्हाला कर सवलत देते