Paytm वरुन मोबाईल रिचार्ज करताय; तर भरा भूर्दंड, मग म्हणाल सांगितलं नाही ! आता आमिष नाही खिशाला चटके

रिवॉर्ड आणि कॅशबॅकच्या आमिषाने पेटीएमवरुन रिचार्ज अनेकांनी धडका लावला होता. आता या ग्राहकांना त्यांचा हा वेडेपणा महागात पाडणार आहे. पेटीएमने मोबाईल रिचार्जवर सरचार्ज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. ग्राहकांनी मोबाईल रिचार्ज केल्यास त्यांना 1 ते 6 रुपयांच्या दरम्यान भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

Paytm वरुन मोबाईल रिचार्ज करताय; तर भरा भूर्दंड, मग म्हणाल सांगितलं नाही ! आता आमिष नाही खिशाला चटके
पेटीएम रिचार्जवर सरचार्जImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 7:16 PM

जर तुम्ही ही मोबाईल रिचार्जसाठी पेटीएमचा (Patym) वापर करत असाल तर आताच थांबा. कारण पूर्वी अशा रिचार्जवर(Recharge) मिळणारे सुलभ लाभ आता मिळणार तर नाहीच उलट तुम्हाला भूर्दंड पडेल. पेटीएमने त्यांच्या प्लॅटफॉर्म वरुन रिचार्ज करणा-या ग्राहकांना 1 ते 6 रुपयांचा सरचार्ज (surcharge) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक कितीचा रिचार्ज करणार, त्यावर त्याला हा सरचार्ज द्यावा लागणार आहे. तुमची बिल अदा करण्याची पद्धत कोणतीही असो, युपीआय द्वारे, क्रेडिट अथवा डेबिट कार्ड अथवा पेटीएम वॉलेट यापैकी कोणत्या ही पद्धतीचा वापर करा, तुम्हाला रिवॉर्ड (Reward) तर सोडाच भूर्दंड सहन करावा लागेल, यात दुमत नाही. गेल्या वर्षी पेटीएमचा मार्केटमधील दमदार प्रतिस्पर्धी फोनपे ने पहिल्यांदा मोबाईल रिचार्ज वर सरचार्ज लावण्याचा प्रयोग राबविला होता.

बात ट्विटरपर ट्रेडिंग हो गई

आता ग्राहकांना भूर्दंड बसणार असेल तर ते शांत थोडंच बसणार. ग्राहकांनी पेटीएमच्या या अप्रिय निर्णयाला ट्विटरवर ट्रेडिंग केले. अनेक युझर्सने पेटीएमच्या या निर्णयाविरोधात टिव टिवात केला. मोबाईल रिचार्जवर पेटीएमने सरचार्ज लावल्याचा कोण ऐक गहजब माजला, त्याची माहिती युझर्संनी ट्विट करुन दिली. वास्तविक कंपनीने याविषयीचे अपडेट मार्च महिन्या अखेरपासून देण्यास सुरुवात केली होती. सध्या ट्विटरमुळे अनेक युझर्सपर्यंत ही खबरबात पोहचली आहे.

हे सुद्धा वाचा

100 रुपयांहून जास्तीच्या रिचार्जवर शुल्क

रिपोर्टस नुसार, पेटीएमवर ग्राहकांनी 100 रुपयांहून अधिकचे मोबाईल रिचार्ज केल्यास त्याला शुल्क द्यावे लागेल. कंपनी किमान 1 रुपये ते जास्तीत जास्त 6 रुपयांचे शुल्क आकारेल. वास्तविक पेटीएमने 2019 मधील त्यांच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध भूमिका घेतली आहे. 2019 मध्ये पेटीएमने, ग्राहकांकडून कार्ड, युपीआय आणि वॉलेटच्या वापर करुन रिचार्ज केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार सशुल्क करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते. पंरतु, रिपोर्टस् नुसार, कंपनी लवकरच सर्व वापरकर्त्यांकडून मोबाईल रिचार्ज वर व्यवहार शुल्क घेण्यास सुरुवात करु शकते आणि सध्या काही ग्राहकांना कंपनी सशुल्क सेवा देत आहे.

फोनपे कडून अगोदरच सशुल्क सेवा

पेटीएमने आता सेवा सशुल्कतेची घोषणा केली असली तरी, फोनपेने यापूर्वीच ही सेवा सशुल्क केली आहे. फोनपे ने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांतच सरचार्ज घेण्यास सुरुवात केली होती. कंपनीने 50 रुपयांपेक्षा जास्तीच्या मोबाईल रिचार्जवर ग्राहकांकडून प्रक्रिया शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली आहे. अत्यंत अल्प स्तरावर शुल्क आकारणी केल्याने त्याचा ग्राहकांवर अधिक परिणाम न होण्याचा दावा कंपनीने केला होता.

रक्कम क्रेडिट करण्याचा ही भूर्दंड

तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम अॅप असेल आणि तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये रक्कम जमा करणार असाल तर अशा ग्राहकांना, वापरकर्त्यांना भूर्दंड बसेल. त्यांना 2 टक्क्यांचा सरचार्ज द्यावा लागेल. परंतू, सध्या हा नियम डेबिट कार्ड अथवा युपीआय वापरकर्त्यांना लागू करण्यात आलेला नाही.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.