Crorepati : पीपीएफ योजना करेल मालामाल, 416 रुपये भरुन व्हा कोट्याधीश

| Updated on: Feb 04, 2023 | 10:10 PM

Crorepati : पीपीएफ खात्यात केवळ 100 रुपयांनी उघडता येते. तुम्हाला या योजनेत अल्प बचत गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभरता येते. तुम्हाला लखपती, कोट्याधीश होता येते.

Crorepati : पीपीएफ योजना करेल मालामाल, 416 रुपये भरुन व्हा कोट्याधीश
व्हा कोट्याधीश
Follow us on

नवी दिल्ली : सार्वजिनक भविष्य निर्वाह निधीच्या (Public Provident Fund) माध्यमातून तुम्हाला बचत तर करता येईलच. पण जोरदार परतावा ही मिळेल. पीपीएफ (PPF) ही सरकारी बचत योजना आहे. नोकरदार आणि गैर नोकरदार वर्गासाठी ही योजना फायद्याची आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठा निधी उभारता येतो. या योजनेतून लखपतीच नाही तर कोट्याधीश होता येते. या योजनेतील गुंतवणूक सुरक्षित असते. सरकारी योजना असल्याने जोखीम नाही. तसेच योजनेतंर्गत तुम्हाला हमखास परतावा (Guaranteed Return) मिळतो. या योजनेत तुम्हाला केवळ 416 रुपयांच्या गुंतवणुकीवर कोट्याधीश होता येईल.

पीपीएफ योजनेत तुमचा पैसा सुरक्षित राहतो. त्यातून चांगला परतावा मिळेल. पीपीएफ खाते तुम्हाला 100 रुपयांच्या गुंतवणुकीपासून उघडता येते. या योजनेत दरवर्षी कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.  जेवढी गुंतवणूक जास्त, तेवढा फायदा जास्त होईल.

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये कमाल वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेवरील व्याज कमी झाले आहे. सध्या या योजनेवर 7.1 टक्के व्याज मिळते. तसेच या योजनेवर ग्राहकांना कंपाऊंडिंग व्याजचा फायदा मिळतो.

हे सुद्धा वाचा

पीपीएफ गुंतवणूकदारांना योजनेत हमखास परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता. या योजनेत तुम्हाला 5-5 वर्षां करीता गुंतवणूक वाढविता येते. या योजनेवर कर सवलत ही मिळते. त्यामुळे बचत, चांगला परतावा आणि कर सवलतही मिळते.

या योजनेत गुंतवणूकदारांना एका वर्षांत कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. तसेच तुम्हाला ट्रिपल ई-टॅक्स कर सवलतीचा फायदा मिळतो. याशिवाय या योजनेत मॅच्युरिटीनंतर जी रक्कम मिळेल, त्यावर कोणताही कर आकारण्यात येत नाही. 15 वर्षानंतर मॅच्युरिटीचा फायदा मिळतो.

पीपीएफ खात्यात दरमहा 12,500 रुपये म्हणजे प्रत्येक दिवशी 416 रुपये जमा केल्यास तुम्हाला कोट्याधीश होता येते. पण त्यासाठी तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला मॅच्युरिटीनंतर एकूण 40.68 लाख रुपये मिळतील.

या योजनेत तुम्हाला एकूण 22.50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला 18.18 लाख रुपयांचे व्याज मिळेल. 15 वर्षांसाठी गुंतवणू करता येते. ही योजना तुम्हाला 5-5 वर्षांसाठी वाढविता येईल. म्हणजे तुम्हाला 25 वर्षांकरिता गुंतवणूक करता येते.

25 वर्षांकरिता गुंतवणूक केल्यास तुमचा एकूण निधी 1.03 कोटी रुपये होईल. या योजनेत तुम्हाला एकूण 37.50 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. तर व्याजाच्या रुपाने एकूण 65.58 लाख रुपये मिळतील. 15 वर्षांपेक्षा 25 वर्षांसाठी गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरते.