काळा, लाल की निळा ? कोणत्या पासपोर्टला मिळते सर्वात मोठे फायदे?

पासपोर्ट हा फक्त ओळखपत्र नसून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक महत्त्वाचं साधन आहे. वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट विविध रंगांचे असतात जसं की काळा, लाल, निळा किंवा हिरवा. या रंगांमागे केवळ सौंदर्यदृष्टी नाही, तर सांस्कृतिक, राजकीय आणि ऐतिहासिक कारणंही असतात.

काळा, लाल की निळा ? कोणत्या पासपोर्टला मिळते सर्वात मोठे फायदे?
Passport
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 4:45 PM

जगभर फिरण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पासपोर्ट हे केवळ ओळखपत्र नाही, तर अनेक देशांचे दरवाजे उघडण्याची एक महत्त्वाची किल्ली असते. पण तुम्हाला माहिती आहे का, पासपोर्टचा रंगदेखील काही प्रमाणात महत्त्वाचा असतो? काळा, लाल, निळा की हिरवा प्रत्येक रंगामागे विशिष्ट कारणं असतात

काळा पासपोर्ट फारच कमी देशांमध्ये आढळतो. न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये हा अधिकृत पासपोर्टचा रंग आहे. काळा रंग हा वेगळेपणाचं आणि अधिकाराचं प्रतिक मानला जातो. न्यूझीलंडचा पासपोर्ट उच्च रँकिंगमध्ये असून, त्याच्या नागरिकांना अनेक देशांत व्हिसाविना प्रवेश मिळतो. शिवाय, आफ्रिकेतील काही देशही काळा रंग वापरतात तो त्यांच्या राजकीय परंपरा आणि ओळखीचा भाग आहे.

लाल पासपोर्ट हा बहुतांश युरोपियन युनियन देशांमध्ये वापरला जातो. स्पेन, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंडसारख्या देशांचे पासपोर्ट हे लालसर रंगाचे असतात. हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार, फ्रान्सचा पासपोर्ट सध्या जगातील टॉप रँकिंगमध्ये आहे त्याद्वारे १९० पेक्षा जास्त देशांत व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. त्यामुळे लाल पासपोर्ट म्हणजे केवळ रंग नाही, तर तो ‘ग्लोबल एक्सेस’चं प्रतीक ठरत आहे.

निळ्या रंगाच्या पासपोर्टची श्रेणी खूप मोठी आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अनेक कॅरिबियन देश निळ्या रंगाचा वापर करतात. यामध्ये अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे पासपोर्ट अत्यंत शक्तिशाली मानले जातात. भारताचा पासपोर्ट मात्र या रँकिंगमध्ये खालच्या क्रमांकावर असून फक्त ६२ देशांमध्येच व्हिसा फ्री किंवा ऑन-अरायव्हल सुविधा मिळते. त्यामुळे निळ्या रंगाचा अर्थ सर्वत्र सारखा नसतो तो त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर आधारित असतो.

जगातले सर्वात ताकदवान पासपोर्ट ज्या देशांकडे आहेत, त्यांचा रंग काहीही असो त्या मागे त्या देशाचा आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता, सामर्थ्य आणि राजनैतिक संबंध असतात. त्यामुळे पासपोर्टचा रंग पाहून अंदाज बांधणे चुकीचे ठरू शकते. पण खरं सांगायचं झालं, तर लाल आणि काळा रंग जागतिक स्तरावर अधिक सन्मानित मानले जातात.