AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार कार्ड हरवलंय? काळजी नको! घरबसल्या मिळवण्यासाठी ही स्मार्ट ट्रिक वापरा

आधार कार्ड हरवणं हे चिंताजनक असलं तरी ते परत मिळवणं आता सोपं आहे. कसं जाणून घ्या UIDAI ची ही सोपी ऑनलाइन पद्धत!

आधार कार्ड हरवलंय? काळजी नको! घरबसल्या मिळवण्यासाठी ही स्मार्ट ट्रिक वापरा
Aadhaar CardImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 5:11 PM
Share

आजच्या काळात आधार कार्ड म्हणजे आपल्या ओळखीचं सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे. कुठेही सरकारी काम असो, बँकेचं व्यवहार असो, किंवा सिम कार्ड घ्यायचं असो सगळीकडे आधार कार्ड लागतोच. अशा वेळी जर ते हरवलं किंवा सापडलं नाही, तर धावपळ होणं स्वाभाविक आहे. पण आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुमचं आधार कार्ड तुम्ही मोबाईलवरून काही मिनिटांत पुन्हा मिळवू शकता.

सगळ्यात आधी, जेव्हा लक्षात येतं की कार्ड हरवलं आहे, तेव्हा त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून UIDAI ला तात्काळ कळवा. तुम्ही त्यांच्या हेल्पलाइन नंबर 1947 वर कॉल करू शकता किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. हे करणं महत्त्वाचं आहे कारण अनेकदा हरवलेली माहिती फसवणुकीसाठी वापरली जाऊ शकते.

यानंतर तुम्ही तुमचं ‘ई-आधार’ म्हणजेच डिजिटल आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. हे कार्ड मूळ कागदी कार्डइतकंच वैध असतं आणि कोणत्याही सरकारी किंवा खासगी कामासाठी वापरता येतं. यासाठी फक्त तुमच्याकडे आधार नंबर किंवा एनरोलमेंट आयडी असणं गरजेचं आहे. नसल्यास, UIDAI ला फोन करून वैयक्तिक माहिती देऊन तो परत मिळवता येतो.

ई-आधार मिळवण्यासाठी UIDAI ची वेबसाइट (uidai.gov.in) उघडा. त्यात ‘Download Aadhaar’ हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा आधार नंबर किंवा EID नंबर टाका, Captcha भरा आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि ‘Verify & Download’ वर क्लिक करा. काही सेकंदांतच तुमचं ई-आधार PDF फाईल स्वरूपात तयार होईल.

ही PDF फायली सुरक्षित असते आणि त्याला पासवर्ड असतो. पासवर्ड तयार होतो तुमच्या नावातील पहिल्या ४ कॅपिटल अक्षरांपासून आणि जन्म वर्षाच्या संयोगाने. उदाहरणार्थ, नाव “Rohit” आणि जन्म वर्ष 1992 असेल तर पासवर्ड “ROHI1992” असा असेल. हे लक्षात ठेवा.

एक गोष्ट मात्र अत्यंत आवश्यक आहे ती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं. कारण OTP त्याच नंबरवर येतो. जर मोबाईल नंबर जुना असेल किंवा अजून लिंक केला नसेल, तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन तो अपडेट करावा लागतो. यानंतरच ई-आधार मिळवण्याची प्रक्रिया यशस्वी होऊ शकते.

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.