November : नवीन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हे होतील बदल, माहिती अवघ्या एका क्लिकवर..

| Updated on: Oct 30, 2022 | 7:11 PM

November : 1 नोव्हेंबरपासून या आरोग्य, गॅस या क्षेत्रात बदल होत आहेत..

November : नवीन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हे होतील बदल, माहिती अवघ्या एका क्लिकवर..
हे होतील बदल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिना (October Month) सणासुदीच्या जल्लोषात कधी संपला, कळलेही नाही. आता ऑक्टोबर महिना संपायला अवघा एक दिवस उरला आहे. त्यानंतर 11 वा महिना सुरु होईल. प्रत्येक नवीन महिन्याच्या (New Month) सुरुवातीला बदल (Change) होतो. सरकारच्यावतीने आपल्याला वेळोवेळी याची माहिती दिली जाते.

नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून काही क्षेत्रात बदल होत आहे. त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर थोडाफार परिणाम होईल. तर कोणत्या क्षेत्रात काय बदल होणार आहेत, याची माहिती घेऊयात..

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) 1 नोव्हेंबरपासून विमाधारकांसाठी नो युवर कस्टमर ( KYC) करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेऊ शकते. आतापर्यंत नॉन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना केवायसीचा तपशील देणे ऐच्छिक होते.

हे सुद्धा वाचा

परंतु, या 1 नोव्हेंबरपासून केवायसीचा नियम अनिवार्य करण्याची शक्यता आहे. नवीन आणि जुन्या अशा दोन्ही ग्राहकांसाठी ही सेवा अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे विम्याचा दावा दाखल करताना केवायसी कागदपत्रे देणे आवश्यक आहे.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या LPG गॅसच्या किंमती निर्धारीत करतात आणि नवीन दर जाहीर करतात. त्यामुळे या 1 नोव्हेंबरला कंपन्या नवीन दर जाहीर करण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती गॅसच्या किंमती आणि 19 किलो व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल होण्याची दाट शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात करण्यात आली होती.

1 नोव्हेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. गॅस बुकिंग नंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविण्यात येईल. त्याआधारे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे.

जेव्हा सिलेंडर घरी येईल. तेव्हा ग्राहकाला मोबाईलवर आलेला ओटीपी डिलिव्हरी बॉयला द्यायचा आहे. हा ओटीपी तो त्याच्या मोबाईलमधील कंपनीच्या अॅपमध्ये सबमिट करेल आणि नंतरच गॅसची डिलिव्हरी होणार आहे.

1 नोव्हेंबरपासून रेल्वेच्या टाईम टेबलमध्ये (Time Table) बदल होत आहे. भारतीय रेल्वे देशभरातील ट्रेनचे वेळापत्रक बदलवणार आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी रेल्वेचे वेळापत्रक बदलणार होते.

वेळापत्रकातील हा बदल 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. पण आता 1 नोव्हेंबरपासून रेल्वेच्या टाईम टेबलमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी हा झालेला बदल बघून घ्या.

यामुळे 13 हजार प्रवासी रेल्वे आणि 7 हजार मालगाड्यांचे वेळापत्रक बदलेल. तर 30 राजधानी ट्रेनच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे. त्यामुळे अगोदरच बुकिंग केले असेल तर आता बदललेल्या वेळेची माहिती अगोदरच घेऊन ठेवा..