Health Insurance : ..तर नाही मिळणार आरोग्य विम्याचा लाभ, 1 नोव्हेंबरपासून बदलणार हा नियम..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Oct 28, 2022 | 5:59 PM

Health Insurance : येत्या 1 नोव्हेंबरपासून नियम बदलणार असल्याने आरोग्य विम्याबाबत हा बदल होणार आहे..

Health Insurance : ..तर नाही मिळणार आरोग्य विम्याचा लाभ, 1 नोव्हेंबरपासून बदलणार हा नियम..
तर नाही मिळणार विम्याचा लाभ
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) आरोग्य विम्यात आता मोठा बदल केला आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून विमाधारकांसाठी (Insurance Holder) हा नियम अंमलात आणण्यात येणार आहे. या नियमांची पुर्तता न करणाऱ्या विमाधारकांना विम्याचा (Health Insurance) लाभ घेताना अचडणीचा सामना करावा लागू शकतो.

येत्या 1 नोव्हेंबरपासून विमाधारकांसाठी KYC तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विमाधारकाला विम्याचा दावा करताना केवायसी कागदपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

IRDAI च्या नवीन नियमामुळे विमाधारकाला दाव्याचा निपटारा करताना आणि तो मंजूर करताना कसलीही अडचण येणार नाही. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

सध्या नॉन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना केवायसीचा तपशील सादर करणे ही ऐच्छिक बाब आहे. पण एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या दाव्यासाठी केवायसी दस्तावेज आवश्यक आहे. त्यामध्ये पत्ता आणि ओळखपत्राचा समावेश आहे.

केवायसी प्रक्रियेचा फायदा ग्राहकाला आणि विमा कंपनीला तसेच नियामक आणि विकास प्राधिकरणाला डेटा बेस तयार करण्यासाठी होणार आहे. यामुळे ग्राहकाचा पॉलिसी रेकॉर्ड जतन करता येईल.

या माध्यमातून विमाधारकाचे ई-इन्शुरन्स खाते तयार करण्यात येणार आहे. ई-केवायसीच्या मदतीने हे खाते लवकर तयार होऊन ग्राहकांना त्याचा वापर करता येईल. याठिकाणी ग्राहक त्याच्या सर्व प्रकारच्या पॉलिसीची अपडेट पाहू शकेल.

तज्ज्ञांच्या मतानुसार, जर तुमच्या विमा पॉलिसीचे 1 नोव्हेंबर नंतर नुतनीकरण होत असेल तर त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी नियमांचे पालन करावे लागेल. त्यातंर्गत तुम्हाला ओळखपत्र सादर करावे लागेल.

एवढचं नाही तर तुम्ही आताच विमा पॉलिसी खरेदी केली असेल अथवा विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुमची तयारी सुरु असेल तर तुम्हाला ई-केवायसीचा वापर करावा लागणार आहे. नाहीतर तुम्हाला विमा पॉलिसी खरेदी करता येणार नाही.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI