Insurance : केवळ 1 रुपयांत मिळवा प्रवास विमा, काय आहे योजना, असा घ्या फायदा..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Oct 28, 2022 | 4:30 PM

Insurance : प्रवासी विमा आणि तो ही केवळ 1 रुपयांत, सविस्तर माहिती वाचूयात..

Insurance : केवळ 1 रुपयांत मिळवा प्रवास विमा, काय आहे योजना, असा घ्या फायदा..
1 रुपयात प्रवास विमा
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : देशातून एका ठिकाणाहून दुसऱ्या टोकाला जायचं अथवा दूरचं अंतर (Long Distance) कापायचं तर आपल्या देशात रेल्वेचा (Railway) प्रवास केल्या जातो. रेल्वेला त्याबाबत पसंती दिल्या जाते. एकतर भाडे (Faire) कमी लागते आणि दुसरे तुम्हाला अगदी आरामात, झोप काढत तुमच्या गंतव्य, इच्छित स्थानी पोहचता येते.

दुर्घटना सांगून येत नाही. अपघातानंतर आपल्या मागे कुटुंबियांना आर्थिक आधाराची गरज पडते. अशावेळी प्रवास विम्याची (Travel Insurance) गरज असते. विमा असेल आणि अपघातात अपंगत्व आले तर प्रवासी विम्यामुळे तुम्हाला मोठी आर्थिक मदत मिळू शकते.

आपण दोन प्रकारे तिकीट घेतो. एकतर ऑनलाईन तिकीट (Online Ticket) बुकिंग करतो अथवा थेट रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट खरेदी (Offline Ticket) करतो. पण या गोष्टी करताना आपण एक गोष्ट कायम दुर्लक्ष करतो, ती कोणती गोष्ट आहे आणि त्यामुळे प्रवास विम्याचा काय फायदा मिळतो ते पाहुयात..

रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना विम्याचे संरक्षण देण्यात येते. वेबसाईट, अॅप अथवा अन्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन तिकीट बुकिंग करताना ट्रॅव्हलिंग इन्शुरन्सचा पर्याय दिसून येतो. यामध्ये तुम्हाला एक रुपयात प्रवास विमा देण्यात येतो.

तुम्ही हा पर्याय निवडला तर तुम्हाला प्रवासादरम्यान अपघात झाल्यास, दुर्घटना झाल्यास तुम्हाला विम्याची आर्थिक मदत मिळते. रेल्वेचा हा प्रवास विमा एसबीआय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमातून मिळतो.

प्रवास विम्याचे संरक्षण कवच असताना अपघातात मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या, प्रवाशाच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. तर अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास 7,50,000 रुपयांची मदत मिळते.

दुर्घटनेत गंभीर जखमी प्रवाशांना 2,00,000 रुपये तर किरकोळ जखमींना रेल्वे विभाग 10 हजारांची आर्थिक मदत देतो. म्हणजे केवळ एक रुपयाच्या विम्यात तुम्हाला मोठी आर्थिक मदत मिळते.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI