AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI ATM New Rule: एसबीआय बँकेकडून सुरक्षेसाठी नवा उपाय; ATM मधून पैसे काढण्यासाठी ओटीपी लागणार

एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने ओटीपी आधारित व्यवहार (एसबीआय एटीएम नवीन नियम) सादर केला आहे. या नवीन प्रणालीच्या वापरात, ग्राहक केवळ ओटीपीच्या आधारे एटीएममधून पैसे काढू शकतील. ग्राहकांना प्रथम त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी मिळेल.

SBI ATM New Rule: एसबीआय बँकेकडून सुरक्षेसाठी नवा उपाय; ATM मधून पैसे काढण्यासाठी ओटीपी लागणार
एटीएम
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 10:08 AM
Share

मुंबई: अलीकडच्या काळात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण खूपच वाढले आहे. मात्र, त्यामुळे सायबर क्राईम किंवा आर्थिक फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेने आपल्या एटीएम कार्डधारकांच्या सुरक्षिततेसाठी एक नवी सुविधा देऊ केली आहे. या निर्णयामागे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेचे सायबर गुन्हे कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना सुरक्षित बँकिंग सुविधा देण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये लाँच केली आहेत. जेणेकरुन आर्थिक गरजांसोबतच सुरक्षिततेची काळजी घेतली जाऊ शकते.

एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने ओटीपी आधारित व्यवहार (एसबीआय एटीएम नवीन नियम) सादर केला आहे. या नवीन प्रणालीच्या वापरात, ग्राहक केवळ ओटीपीच्या आधारे एटीएममधून पैसे काढू शकतील. ग्राहकांना प्रथम त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी मिळेल. ज्याच्या आधारे एटीएममधून पैसे काढता येतील. त्यामुळे फसवणूक टाळण्यास मदत होईल. एटीएम क्लोनिंग किंवा इतर फसवणूक टाळली जाईल कारण ओटीपीशिवाय रोख व्यवहार होणार नाहीत. एटीएममध्ये मोबाईल फोनवरील ओटीपी टाकल्यानंतरच पैसे काढता येतील.

स्टेट बँकेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिकता असल्याचे बँकेने म्हटले आहे. ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या या पोस्टमध्ये एक छोटा व्हिडिओ देखील जोडला गेला आहे, ज्यामध्ये OTP आधारित रोख व्यवहारांबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करणार?

2020 मध्ये, SBI ने सुरक्षा लक्षात घेऊन OTP आधारित ATM व्यवहाराची प्रणाली (SBI ATM नवीन नियम) सुरू केली. हीच यंत्रणा यावेळी रीफ्रेश करण्यात आली असून सुरक्षेच्या अधिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रोख रक्कम काढण्यापूर्वी, ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल ज्याची एटीएममध्ये पडताळणी करावी लागेल. जर हा ओटीपी एटीएममध्ये पडताळला नसेल तर पैसे काढले जाणार नाहीत. तेव्हा लक्षात ठेवा की रोख रक्कम काढण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल तुमच्याकडे ठेवा.

फक्त एसबीआयच्या एटीएम केंद्रावर नियम लागू

हा नियम फक्त एसबीआय एटीएम किंवा डेबिट कार्ड असलेल्यांसाठी आहे. जर तुमच्याकडे दुसऱ्या बँकेचे कार्ड असेल आणि तुम्ही SBI ATM मधून पैसे काढत असाल तर OTP ची गरज भासणार नाही. तुम्ही SBI चे कार्डधारक असाल पण इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढत असाल तर तुम्ही OTP सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही. SBI कार्डसोबत SBI चे ATM असायला हवे. या स्थितीत ओटीपी आधारित एटीएम व्यवहार होईल.

एसबीआय कार्डमधून पैसे काढण्यासाठी ग्राहक एसबीआय एटीएममध्ये जाताच त्याच्या मोबाइल फोनवर 4 अंकी ओटीपी पाठवला जाईल. एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर एक विंडो उघडेल ज्यामध्ये ओटीपी टाकावा लागेल. यामुळे ओटीपीची पडताळणी होईल आणि एटीएममधून पैसे काढले जातील.

संबंधित बातम्या:

राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांशेजारी उभारले जाणार पेट्रोल पंप, मिळणार ‘या’ खास सुविधा

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.