आता घरबसल्या मिळवा FD इंटरेस्ट सर्टिफिकेट; SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा

| Updated on: Jul 23, 2021 | 12:23 PM

SBI Bank | SBI बँकेत सध्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर जास्त व्याज मिळत आहे. 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 2.90 टक्के इतका व्याजदर मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी 3.40 टक्के इतका व्याजदर दिला जात आहे. तसेच एक ते दोन वर्षांसाठी पाच टक्के व्याजदर आहे. तर पाच ते दहा वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 5.40 टक्के इतका व्याजदर आहे.

आता घरबसल्या मिळवा FD इंटरेस्ट सर्टिफिकेट; SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा
एसबीआयच्या पेन्शन सेवेमुळे त्रस्त आहात? मग या नंबरवर करा मॅसेज, काही मिनिटांत तक्रार होईल दूर
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेची ऑनलाईन सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना आता एक नवी सुविधा मिळणार आहे. या सुविधेमुळे आता ग्राहकांना घरबसल्या मुदतठेव योजनेचे (FD) व्याज प्रमाणपत्र मिळेल. एसबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच नेट बँकिंगच्या माध्यमातूनही ग्राहक व्याज प्रमाणपत्र मिळवू शकतात.

एसबीआय बँकेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार चार सोप्या गोष्टींचे पालन करुन मुदतठेव योजनेचे (FD) व्याज प्रमाणपत्र मिळवता येईल. SBI बँकेत सध्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर जास्त व्याज मिळत आहे. 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 2.90 टक्के इतका व्याजदर मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी 3.40 टक्के इतका व्याजदर दिला जात आहे. तसेच एक ते दोन वर्षांसाठी पाच टक्के व्याजदर आहे. तर पाच ते दहा वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 5.40 टक्के इतका व्याजदर आहे.

ऑनलाईन व्याज प्रमाणपत्र कसे मिळवाल?

* एसबीआय बँकेच्या onlinesbi.com या संकेतस्थळावर जा.
* संकेतस्थळावर गेल्यानंतर पर्सनल बँकिंग पर्यायावर क्लिक करुन ई-सर्व्हिस टॅबमध्ये जावे.
* त्याठिकाणी माय सर्टिफिकेट हा ऑप्शन निवडावा.
* त्यानंतर व्याज प्रमाणपत्राच्या पर्यायावर क्लिक करावे. यामध्ये तुम्हाला व्याजाची संपूर्ण रक्कमही तपासता येईल.

घरबसल्या SBI बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत अकाऊंट कसं ट्रान्सफर करायचं?

*एसबीआयच्या www.onlinesbi.com या संकेतस्थळावर जाऊन युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
*लॉग इन झाल्यानंतर e services या पर्यायावर क्लिक करावे.
*त्याठिकाणी तुम्हाला Transfer of savings account असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे.
*यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा अकाऊंट नंबर आणि ब्रांच दिसेल.
*आता तुम्हाला ज्या शाखेत (Branch) अकाऊंट ट्रान्सफर करायचे असेल त्याचा कोड इन्सर्ट करावा. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला संबंधित *शाखेचे नाव दिसेल. त्यावर क्लिक करुन नीट खातरजमा करुन घ्यावी.
*त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला ब्रांच ट्रान्सफरची रिक्वेस्ट नोंदवली *गेल्याचा मेसेज येईल. त्यानंतर एका आठवड्यात तुमचे बँक खाते संबंधित शाखेत ट्रान्सफर होईल.

इतर बातम्या :

Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर

Alert! 31 मार्च करा ‘हे’ महत्त्वाचं काम, अन्यथा खात्यातून पैसे नाही निघणार

बंपर ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा