आपल्या ग्राहकांसाठी एसबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय; आएमपीएस सेवेच्या नियमामध्ये केले बदल, ‘असे’ असतील नवे नियम

जर तुमचे खाते भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नव्या बदलानुसार बँकेने आपल्या तत्काळ पेमेंट सेवा मर्यादेमध्ये वाढ केली आहे.

आपल्या ग्राहकांसाठी एसबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय; आएमपीएस सेवेच्या नियमामध्ये केले बदल, असे असतील नवे नियम
स्टेट बँक ऑफ इंडिया
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 6:45 AM

नवी दिल्ली : SBI Increases IMPS Transaction Limit जर तुमचे खाते भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नव्या बदलानुसार बँकेने आपल्या तत्काळ पेमेंट सेवा मर्यादेमध्ये वाढ केली आहे. तत्काळ पेमेंट सेवेची मर्यादा आता दोन लाखांहुन पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने तत्काळ पेमेंट सेवेची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवण्याचे आदेश देशातील बँकांना दिले होते. आरबीआयच्या आदेशानुसार एसबीआयने तत्काळ पेमेंटची मर्यादा वाढून पाच लाखांपर्यंत केली आहे.

जीएसटीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार

एसबीआयने तत्काळ पेमेंट सेवेच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. मात्र यासाठी ग्राहकांना आता अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागणार आहेत. ग्राहकांना दोन लाखांपेक्षा अधिक पैशांचा व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी 20 रुपये जीएसटी देखील भरावा लागणार आहे. आयएमपीएस ही सेवा रीयल टाईम फंड ट्रांन्सफर प्रकारातील सेवा असल्याने ग्राहकांना 24 तास कधीही या सेवेचा लाभ घेता येतो.

IMPS वर एसबीआय कीती चार्ज आकारते

एक हजार रुपयांपर्यंतच्या आयएमपीएस सेवेसाठी कोणतेही चार्ज आकारण्यात येत नाही

एक हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर दोन रुपये जीएसटी चार्च आकारण्यात येतो

दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर चार रुपये जीएसटी आकारण्यात येतो

एक लाख रुपयांपासून ते दोन लाखांपर्यंत बारा रुपये जीएसटी आकारण्यात येतो

तर दोन लाखांपासून पाच लाखांपर्यंतच्या व्यवहारांवर वीस रुपयांचा जीएसटी आकारण्यात येतो.

सबंधित बातम्या

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे

Digital Payment | भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 4 वर्षात 70 पटींनी वाढले डिजिटल पेमेंट!

ओएनजीसीची धुरा पहिल्यांदा महिलेच्या हातात,अलका मित्तल असतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक, ऊर्जा क्षेत्रात महिलांचे दमदार पाऊल