AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओएनजीसीची धुरा पहिल्यांदा महिलेच्या हातात,अलका मित्तल असतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक, ऊर्जा क्षेत्रात महिलांचे दमदार पाऊल 

देशाला 69 टक्के खनिज तेल आणि 62 टक्के नैसर्गिक वायू पुरविणा-या ओएनजीसी (ONGC) कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदा महिलेच्या हाती कंपनीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

ओएनजीसीची धुरा पहिल्यांदा महिलेच्या हातात,अलका मित्तल असतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक, ऊर्जा क्षेत्रात महिलांचे दमदार पाऊल 
अल्का मित्तल
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 9:01 AM
Share

देशातील सात महारत्न असलेल्या कंपन्यांमधील सर्वात प्रभावी आणि महत्वपूर्ण ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कंपनीची (ONGC) धुरा पहिल्यांदा महिलेच्या हाती देण्यात आली आहे. ऊर्जा क्षेत्रातील दमदार कंपनीने तिच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल (Alka Mittal) यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे महिलांचे ऊर्जा क्षेत्रातील स्थान बळकट होणार असून महिलांचा प्रत्येक क्षेत्रात वाढणारा दबदबा देशातील तरुणींसाठी अभिमानास्पद आहे.

अलका मित्तल या ओएनजीसीच्या चेअरमन असतील त्यांच्यावर व्यवस्थापकीय संचालक पदाची(CMD) अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वीचे चेअरमन सुभाष कुमार ((Subhash Kumar) 31 डिसेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी कंपनीने मित्तल यांच्या खाद्यांवर कंपनीची जबाबदारी टाकली आहे. 12 वर्षांपूर्वी मित्तल यांनी कंपनीत मोठ्या पदावर काम केलेले आहे. भारतीय सरकारच्या महत्वपूर्ण कंपनीत महिला अध्यक्ष पदी नियुक्तीकडे मोठ्या सकारात्मकरित्या पाहिले जात आहे. सरकारने वेळेवर घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

भोंगळ कारभार उघड

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे अध्यक्ष वा चेअरमन सेवानिवृत्त होण्यापूर्वीच त्या पदी कोणची नियुक्ती करण्यात येणार आहे. याची घोषणा करण्यात येते. दोन महिन्यांपूर्वी सदर व्यक्तीच्या नावाची चर्चा करुन नाव घोषीत करण्यात येते. मात्र ओएनजीसीमध्ये गेल्या वर्षात या प्रथेला फाटा देण्यात आला आहे. सेवानिवृत्त व्यक्तीनंतर कंपनी दोन दिवस विना अध्यक्ष काम करत असल्याचे प्रकर्षाने बघायला मिळाले. हा भोंगळ कारभार यामुळ चव्हाट्यावर आला आहे.

यापूर्वीचे सीएमडी सुभाष कुमार अर्थ विभागाचे प्रमुख होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्याकडे चेअरमन आणि सीएमडी या दोन्ही पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता. कंपनीचे शेवटचे प्रमुख शशी शंकर हे 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांच्या जागी कोणाचीच थेट नियुक्ती करण्यात आली नव्हती. अतिरिक्त जबाबदारी खाद्यांवर टाकून कंपनीने कुमार यांच्या जागी नवीन नियुक्ती केली नव्हती. त्यांच्या निवृत्तीनंतर दोन दिवसांनी मित्तल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

कोण आहेत मित्तल 

डॉ. अलका मित्तल या उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे अर्थशास्त्रातील पदवीत्यूर पदवी, एमबीए(मानव संसाधन), वाणिज्य शाखेतील पदवी आणि बिझनेस स्टडीमधील डॉक्टरेट आहे. कंपनीच्या वेबसाईट वरील माहितीनुसार, मित्तल यांनी 1985 मध्ये शिकाऊ पदवीधर म्हणून कंपनीत पहिल्यांदा प्रवेश केला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्या कंपनीत मानव संसाधन प्रमुख पदी दाखल झाल्या. ओएनजीसीच्या इतिहासात या विभागाचे पूर्णवेळ संचालन करणा-या त्या पहिल्याच होत्या. कौशल्य विकास विभागाचे प्रमुख पदही त्यांनी कंपनीत भूषविले. नॅशनल अप्रेंटिसशिप योजना त्यांनीच सुरु केली होती. त्याचा फायदा देशातील तरुणांना झाला आणि चांगले मनुष्यबळ या माधम्यातून तयार झाले.

संबंधित बातम्या : 

कर्ज मंजुरीला ‘सिबिल’चं विघ्न; जाणून घ्या- सिबिल स्कोअर सुधारणेच्या टिप्स

काय सांगता विना इंटरनेट पाठवता येतील पैसे !, एकावेळी 200 रुपये तर एकूण 2000 रुपयांचा करता येईल व्यवहार

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.