Digital Payment | भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 4 वर्षात 70 पटींनी वाढले डिजिटल पेमेंट!

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ट्रान्झॅक्शनच्या संख्येत दुपटीने भर पडली आहे. गेल्या वर्षभरात एकूण 71.59 लाख कोटींचे 38 अब्ज ट्रान्झॅक्शन करण्यात आले.

Digital Payment | भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 4 वर्षात 70 पटींनी वाढले डिजिटल पेमेंट!
UPI
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 7:34 PM

नवी दिल्ली : डिजिटल अर्थसाधनांमुळे एका क्लिकवर लाखांचे अर्थव्यवहार सहजशक्य झाले आहे. वर्ष 2021 मध्ये ट्रान्झॅक्शन करण्यासाठी सर्वाधिक भारतीयांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (UPI) पर्याय निवडला. वर्ष 2021 मध्ये डिसेंबर महिन्याअखेर 456 कोटी डिजिटल ट्रान्झॅक्शनची संख्या नोंदविली गेली. आतापर्यंतची UPI ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डब्रेक संख्या ठरली आहे. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे.

रकमेचा दृष्टीकोनातून विचार केल्यास सव्वा आठ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची देवाणघेवाण करण्यात आली. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ट्रान्झॅक्शनच्या संख्येत दुपटीने भर पडली आहे. गेल्या वर्षभरात एकूण 71.59 लाख कोटींचे 38 अब्ज ट्रान्झॅक्शन करण्यात आले.

डिजिटल व्यवहाराचे एकिकृत माध्यम:

11 एप्रिल 2016 पासून भारतीय रिझर्व्ह बँक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) यांच्या संयुक्त प्रयत्नातून डिजिटल व्यवहार प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. कोविड प्रादूर्भावाच्या कालखंडात सामाजिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात UPI व्यवहार संख्येत मोठी वाढ दिसून आली.

अर्थ जगतातील संशोधन संस्था ‘जेफरीज’ने वर्ष 2022 मध्ये भारतातील 50 टक्के डिजिटल पेमेंट UPI द्वारे होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सुलभ पेमेंट पद्धतीमुळे यूपीआयच्या वापरात वाढ झाली आहे.

आकडेवारी दृष्टीक्षेपात:

  1. 2019 – 1 अब्ज ट्रान्झॅक्शन
  2. 2020– 2 अब्ज ट्रान्झॅक्शन
  3. 2021 (ऑगस्ट अखेर)- 3 अब्ज ट्रान्झॅक्शन
  4. 2021 (डिसेंबर अखेर)- 4 अब्ज ट्रान्झॅक्शन

UPI विषयीचे महत्वाचे मुद्दे:

  • UPI द्वारे किमान 50 ते कमाल एक लाख रुपयांचे अर्थव्यवहार एका क्लिकवर करता येतात.
  • वर्तमान UPI व्यवहाराची मर्यादा एक लाख रुपये आहे. मात्र, प्रत्येक बँकेने विशिष्ट मर्यादा निर्धारित केली आहे.
  • लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्यक नसते.
  • युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते
  • UPI सहाय्याने भिम (BHIM), फोन पे (Phone Pay), गूगल पे (Google Pay),मोबिक्विक (Mobikwik), पेटीएम (Paytm) द्वारे डिजिटल ट्रान्झॅक्शन पूर्ण केले जाऊ शकते.
  • युनिफाईड पेमेंट इंटरफेस पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.

इतर बातम्या –

ऑनलाईन फसवणुकीची दखल पोलीस घेत नाहीत? सायबर भामट्यांशी लढण्याचा ई-पर्याय

कर्ज मंजुरीला ‘सिबिल’चं विघ्न; जाणून घ्या- सिबिल स्कोअर सुधारणेच्या टिप्स

घर स्वप्नांचं : निवड तुमची, शिफारस तज्ज्ञांची; गृह कर्ज की होम फायनान्स?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.