TAX SAVING : करबचतीसाठी शेवटच्या क्षणी गुंतवणूक टाळा; जाणून घ्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना

| Updated on: Apr 18, 2022 | 5:30 AM

गुंतवणुकीचे पुरावे सादर करताना मार्च महिन्यात नोकरदारांची दमछाक होते. बहुतांश लोक कर बचतीसाठी (TAX SAVING) ऐनवेळी गुंतवणूक करतात. मात्र, यामुळे तुमचा तोटाच होण्याची शक्यता जास्त असते.

TAX SAVING : करबचतीसाठी शेवटच्या क्षणी गुंतवणूक टाळा; जाणून घ्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना
Follow us on

नाशिकच्या संजय सुर्वे यांनी आर्थिक वर्षात गुंतवणुकीचं (investment) कोणतंही नियोजन केलं नव्हतं. गुंतवणुकीसाठी त्यांनी पैशांची (Money) जमवाजमव सुरू केलीये. मात्र, कर बचतीसाठी पैसै कुठे गुंतवावेत याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. गुंतवणुकीचे पुरावे सादर करताना मार्च महिन्यात नोकरदारांची दमछाक होते. बहुतांश लोक कर बचतीसाठी (TAX SAVING) ऐनवेळी गुंतवणूक करतात. मात्र, यंदा कोरोनामुळे सामान्य नागरिकांचं बजेट बिघडलंय. त्यामुळे बऱ्याच जणांनी कर बचतीसाठी गुंतवणूकच केली नाही. ऐनवेळी कर वाचवण्यासाठी कुठेही गुंतवणूक करण्यात येते. चुकीच्या गुंतवणुकीचा फटका त्यांना नंतर सहन करावा लागतो. तुम्ही अशाच परिस्थितीत सापडला असताल तर ऐनवेळी गुंतवणूक करू नका. चांगला परतावा मिळणाऱ्या योजनेत गुंतवणूक करा. तसेच यामुळे तुमचं आर्थिक ध्येयही पूर्ण होऊ शकते. चला, तर गुंतवणुकीसाठी कोणते पर्याय आहेत हे पाहूयात.

सुकन्या समृद्धी योजना

कर बचतीसाठी सुकन्या समृद्दी योजना गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली असल्यानं सरकार या योजनेमध्ये वार्षिक 7.6 टक्के दरानं व्याज देते. सर्व लघुबचत योजनांच्या तुलनेत सुकन्या योजनेत सर्वाधिक व्याज मिळते. टॅक्स सेव्हींगच्या दृष्टीने ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत आयकरात सवलत देखील मिळते. तुम्हाला 10 वर्षाच्या आतील सुकन्या असेल तर तिच्या नावाने या प्लानमध्ये गुंतवणूक करा . तुम्हाला मुदत संपल्यानंतर मिळणाऱ्या रक्कमेवर करबचतीचा लाभ मिळवा

मुदत ठेव योजना

बँकेत किंवा पोस्टात 5 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी एफडी केल्यास 80 सीअंतर्गत गुंतवणूक समजली जाते. अशा गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.सध्या बँकेतील पाच वर्षाच्या एफडीवर 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जातं. तसेच पोस्ट ऑफिसमधील पाच वर्षाच्या एफडीवर 6.7 टक्के व्याज मिळतं. एफडीतून मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नाचा समावेश तुमच्या वार्षिक उत्पन्नात होतो. त्यामुळे टॅक्स स्लॅबच्या नियमांप्रमाणे कर भरावा लागतो.

राष्ट्रीय बचत पत्र

करबचतीसाठी एकरकमी गुंतवणूक करायची असल्यास एनएससी हा सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्टाच्या पाच वर्षाच्या बचत पत्रावर 7.1 टक्के व्याज मिळतं. दर सहा महिन्यांनी व्याज मिळतं. मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागतो. एनएससीमध्ये गुंतवणूक करणं खूप सोप आहे. त्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा. एनएससीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळते.

ईएलएसएस

ईएलएसएस म्हणजे Equity Linked Saving Scheme हा देखील गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. यात तीन वर्षाचा लॉक इन पीरियड असतो म्हणजेच एकदा गुंतवणूक केल्यानंतर तीन वर्षांपर्यंत पैसे काढता येत नाहीत. कर बचतीसाठी सर्वात कमी लॉक इन पीरियडअसणारी ही योजना आहे. ज्यांना नुकतीच नोकरी लागली आहे त्यांनी ELSS मध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. टॉप 10 ELSS मधून गेल्या वर्षभरात 20 ते 40 टक्के परतावा मिळालाय. तीन वर्षात 30 ते 40 टक्के परतावा मिळू शकतो. एक लाख रुपयांपर्यंत मिळणारं व्याज करमुक्त असते. याशिवाय PPFआणि NPS हे देखील गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत. या दोन्ही योजना तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी उपयुक्त आहेत.

संबंधित बातम्या

घर बसल्या PPF, SSY खात्यात पैसे होतील जमा, अशा पध्दतीने इंटरनेट- मोबाईल बँकिंग करा ॲक्टिव्हेट

तुम्ही तुमच्या वाहनात सीएनजी कीट बसवताय का.. तर, थांबा आता ‘सीएनजी’ गॅसही मिळणार चढया दरात !

Gold-Silver Weekly Report : आठवडाभरात सोने 1,063 रुपयांनी महागले; चांदीच्या दरातही तेजी