Oppo चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लाँच होण्याआधीच किंमत झाली लीक, जाणून घ्या हा बजेट फोन असेल की नाही?
ओप्पो रेनो 15 प्रो मिनी लवकरच भारतात लाँच होणार आहे, परंतु लाँच होण्यापूर्वीच त्याची किंमत आणि फीचर्सची माहिती लीक झाली आहे. भारतीय बाजारात हा फोन किती किंमतीला लाँच केला जाईल आणि तो कोणत्या फीचर्ससह सुसज्ज असेल ते जाणून घेऊयात.

येत्या नवीन वर्षात ओप्पो कंपनी त्यांचा ओप्पो रेनो 15 सीरीज लवकरच भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. ज्यामध्ये Reno 15, Reno 15 Pro आणि Reno 15 Pro Mini यांचा समावेश आहे. लाँचिंगपूर्वी कंपनीने फोनच्या फीचर्स आणि डिझाइनबद्दल टीझर जारी करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच एका टिपस्टरने रेनो 15 प्रो मिनीची बॉक्स किंमत उघड केली. चला तर मग आजच्या लेखात आपण ओप्पोच्या लीक झालेल्या या फोनची किंमत फिचर्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
ओप्पो रेनो 15 प्रो मिनीची भारतातील किंमत (लीक)
टिपस्टर यांच्या दाव्यानुसार भारतात ओप्पो 15 प्रो मिनीची बॉक्स किंमत 64 हजार 999 रूपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. भारतात बॉक्सच्या किमती सामान्यतः किरकोळ किमतींपेक्षा जास्त असतात, त्यामुळे या फोनची विक्री किंमत कमी असू शकते. टिपस्टर सांगतात की या फोनची विक्री किंमत 59 हजार 999 रूपये असू शकते. बँक कार्ड सवलतींसह हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी असेल. सध्या या आगामी ओप्पो फोनची लाँच तारीख जाहीर केलेली नाही, परंतु लवकरच येत्या नवीन वर्षात स्मार्टफोन लाँच होण्याची अपेक्षा आहे.
ओप्पो रेनो 15 प्रो मिनी स्पेसिफिकेशन्स (लीक)
टिपस्टरचा दावा आहे की या फोनमध्ये 1400 निट्स ब्राइटनेससह 6.32-इंच 1.5K LTPS OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 प्रोसेसर असू शकतो.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये मागील बाजूस 200 मेगापिक्सेलचा सॅमसंग एचपी5 प्रायमरी कॅमेरा असेल, तसेच 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आणि 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा सेन्सर असेल. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील शक्य आहे. 80 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 6200 एमएएचची पॉवरफूल बॅटरी फोनला पॉवर देईल. 187 ग्रॅम वजनाचा हा फोन 12 जीबी/256 जीबी आणि 12 जीबी/512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.
