DLC : पेन्शनधारकांसाठी खूषखबर, सरकारने जीवन प्रमाणपत्रासंबंधी घेतला हा निर्णय..

| Updated on: Nov 02, 2022 | 8:21 PM

DLC : निवृत्तीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे..

DLC : पेन्शनधारकांसाठी खूषखबर, सरकारने जीवन प्रमाणपत्रासंबंधी घेतला हा निर्णय..
निवृत्तीधारकांना मोठा दिलासा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : देशातील निवृत्तीधारकांना (Pensioners) निवृत्ती रक्कम प्राप्त करण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. त्याला जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) असेही नाव आहे. तर हयातीचा दाखला हा कर्मचारी जीवंत असल्याचा पुरावा असतो आणि तो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सादर करावा लागतो. त्यासाठीची किचकट प्रक्रिया आता बदलणार आहे.

यापूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा हयातीचा दाखला हा दरवर्षी पुरावा म्हणून सादर करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या पेन्शनाला आडकाठी होत नव्हती. यापूर्वी त्यांना बँकेत जाऊन हे प्रमाणपत्र सादर करावे लागत होते.

पण केंद्र सरकारने आता त्यात बदल केला आहे. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. त्यांच्यासाठी ऑनलाईन जीवन प्रमाण सेवा सुरु करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

बायोमॅट्रिक-इनबेल्ड डिजिटल सेवेमार्फत निवृत्त कर्मचाऱ्यांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जमा करता येईल. त्यासंबंधीची प्रक्रिया काय आहे ती समजून घेऊयात..

डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचा नमुना तुम्ही बँक, सरकारी कार्यालय, पोस्ट ऑफिस, जीवन प्रमाणपत्र अॅपच्या माध्यमातून मिळवू शकता. jeevanpramaan.gov.in हे अॅप डाऊनलोड करुन ही सुविधा मिळते.

ही सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला यापूर्वीच तुम्ही दिलेल्या बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर करता येईल. यामध्ये तुम्हाला बायोमॅट्रिक फिंगरप्रिंट वा आयरिश स्कॅनिंग डिव्हाईस यांची गरज पडेल.

अॅपच्या माध्यमातून हयातीचा दाखला देण्यासाठी तुम्हाला अगोदर आधार, मोबाईल क्रमांक, निवृत्ती खाते क्रमांक आणि तुमचा तपशील द्यावा लागेल. ई-मेल आणि मोबाईलवर OTP येईल. तो सबमिट केल्यावर हयातीचा दाखल करता येईल.

त्यानंतर निवृत्तीधारकाचा आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक खात्याचा तपशील आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. बायोमॅट्रिक पडताळ्यानंतर मोबाईलवर एसएमएस येईल. त्यात हयात दाखल्याचा आयडी असेल.

याशिवाय तुम्ही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) मार्फत फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हयातीचा दाखल जमा करु शकता.