Today’s gold, silver prices: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति तोळ्यामागे 100 रुपयांनी महाग झाले आहे, तर चांदीचा भाव देखील 300 रुपयांनी वधारला आहे.

Todays gold, silver prices: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
आजचे सोन्याचे दर
| Updated on: May 30, 2022 | 3:28 PM

मुंबई : आज पुन्हा एकदा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर (Gold rate) प्रति तोळा 47,850 रुपये एवढे आहेत. रविवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये एवढा होता. म्हणजेच आज 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 100 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज 24 कॅरट सोन्याचे (Gold) भाव प्रति तोळा 52,200 रुपये आहेत. रविवारी 24 कॅरट सोन्याचे भाव प्रति तोळा 52,090 रुपये इतके होते. आज 24 कॅरट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे आज चांदी देखील वधारली असून, आज चांदीचे रेट (Silver rate) प्रति किलो 62,500 रुपये इतके आहेत. रविवारी चांदीचे दर प्रति किलो 62200 रुपये इतके होते. आज चांदीच्या दरात प्रति किलोमागे 300 रुपयांची वाढ झाली आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

आज जारी करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या भावानुसार सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आज राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 47,850 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,200 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,900 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,240 रुपये इतका आहे. उपराजधानी नागूपरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,900 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,240 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,900 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,240 रुपये इतका आहे.

प्रमुख महानगरातील भाव

  1. आज दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 47,850 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,200 रुपये इतका आहे.
  2. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 47,850 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,200 रुपये इतका आहे.
  3. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा रेट प्रति तोळा 47,850 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा रेट 52,200 रुपये इतका आहे.
  4. चेन्नईमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा अनुक्रमे 47,950 आणि 52,310 रुपये इतका आहे.