UPI Payment Charges : UPI सेवांवर शुल्क लागणार नाही, अर्थ मंत्रालयाचा निर्णय, ट्वीट करून दिली माहिती

अर्थ मंत्रालयानं ट्वीट करून सांगितलं की, UPI पेमेंट सेवेवर कोणत्याही प्रकारचे शुल्क लावले जाणार नाही. सरकारनं डिजीटल पेमेंट सिस्टीमला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

UPI Payment Charges : UPI सेवांवर शुल्क लागणार नाही, अर्थ मंत्रालयाचा निर्णय, ट्वीट करून दिली माहिती
UPI सेवांवर शुल्क लागणार नाही, अर्थ मंत्रालयाचा निर्णय
| Updated on: Aug 21, 2022 | 10:14 PM

नवी दिल्ली : UPI सेवांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्याचा सरकारचा विचार नाही. अर्थ मंत्रालयानं हा निर्णय घेतला. सरकार डिजिटल पेमेंटसाठी आर्थिक मदत करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया युपीआय पेंमेंटवर विचार करत होती. आरबीआय MDR चार्ज म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट लावण्याचा विचार करत होती. यासंदर्भात अर्थ मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय. UPI जनतेसाठी अत्यंत सुविधाजनक प्लॅटफार्म आहे. अर्थव्यवस्थेत याचा मोठा हिस्सा आहे. त्यामुळं सरकारचा यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्याचा विचार करत नाही. सर्व्हिस प्रोव्हायडरकडून रिकव्हरीसाठी अन्य पर्यायांवर विचार केला जात आहे. डिजीटल (Digital) पेमेंट सिस्टीमला मजबूत करण्यासाठी सरकारनं आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलंय. ही मदत याही वर्षी सुरूच राहील.

1500 कोटींची आर्थिक मदत केली होती

अर्थ मंत्रालयानं ट्वीट करून सांगितलं की, UPI पेमेंट सेवेवर कोणत्याही प्रकारचे शुल्क लावले जाणार नाही. सरकारनं डिजीटल पेमेंट सिस्टीमला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सरकारनं डिजीटल पेमेंट सिस्टममुळं होणाऱ्या एमडीआर चार्जच्या नुकसानीसाठी 1 हजार 500 कोटी रुपये मदत जाहीर केली होती.

1 जानेवारी 2020 पासून UPI सर्व्हीस चार्ज फ्री

सरकारनं 1 जानेवारी 2020 ला रुपे डेबीट कार्ड आणि UPI चार्ज फ्री केलं आहे. यामुळं प्रत्येक ट्रान्झेक्शनवर एमडीआर चार्जचं नुकसान होत होता. याच्या भरपाईसाठी आर्थिक मदत दिली जात होती. UPI सर्व्हीस ऑनलाईन देण्याघेण्यासाठी सोपे आणि लोकप्रीय माध्यम बनले आहे. NPCI च्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये UPIच्या मदतीनं 600 कोटी ट्रान्झेक्शन केलं गेलं. या ट्रान्झेक्शनच्या मदतीनं 10 लाख कोटीचं ट्रान्झेक्शन पूर्ण केलं गेलं.