अखेर प्रतिक्षा संपली; 15 डिसेंबरपासून होणार ओला ई-स्कूटरचे वितरण

जर तुम्ही ओला ई-स्कूटर बुक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लवकरच तुम्हाला तुमची ओला स्कुटर मिळू शकते. येत्या 15 डिसेंबरपासून ओला स्कूटरच्या वितरणाला सुरुवात होणार  आहे.

अखेर प्रतिक्षा संपली; 15 डिसेंबरपासून होणार ओला ई-स्कूटरचे वितरण
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 10:33 AM

नवी दिल्ली : जर तुम्ही ओला ई-स्कूटर बुक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लवकरच तुम्हाला तुमची ओला स्कुटर मिळू शकते. येत्या 15 डिसेंबरपासून ओला स्कूटरच्या वितरणाला सुरुवात होणार  आहे. याबाबत ओला इलेक्ट्रिक कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी ट्विट करत माहिती दिली. स्कूटरचे उत्पादन वाढले असून, येत्या 15 डिसेंबरपासून ओला स्कूटरच्या वितरणाला सुरुवात होणार  आहे.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये ?

भावेश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता स्कूटरच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या 15 डिसेंबरपासून ओला स्कूटरच्या वितरणाला सुरुवात होणार  आहे. आम्ही ग्राहकांच्या सय्यमाला सलाम करतो की, त्यांनी अनेक दिवस या स्कूटरची वाट पाहिली. आता लवकरच त्यांची स्कूटर त्यांना मिळणार आहे. आपण अगदी माफक शुल्कामध्ये ही स्कूटर बूक करण्याची सुविधा ग्राहकांना दिली होती. तसेच स्कूटरच्या टेस्ट डाईव्हची सुविधा देखील कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

केवळ 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार

कंपनीने केलेल्या  दाव्यांनुसार, ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होणार आहे. हा चार्जिंग वेळ 75 किलोमीटरची रेंज देण्यासाठी पुरेसा असेल, तर स्कूटरची संपूर्ण चार्ज रेंज सुमारे 150 किमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये ग्राहकांचा अधिकाधिक फायदा होऊ शकतो. तसेच पेट्रोल, डिझेलच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून पण सुटका होऊ शकते. 2022 च्या उन्हाळ्यापर्यंत जगातील 15 टक्के ई-स्कूटर तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनीच्या या प्रोडक्टला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

संबंधित बातम्या

31 डिसेंबपर्यंत दाखल करता येणार ‘आयटीआर’; आयकर विभागाकडून जनजागृती

देशात सेमिकंडक्टरचा तुटवडा; वाहन निर्मितीवर परिणाम

…तर तुम्ही अशा पद्धतीनं सोन्याच्या कर्जाची परतफेड करू शकता, RBI चा नियम काय सांगतो?