Seat Belts : सीट बेल्ट बांधा नाहीतर पावती फाडेल की पोलीस मामा..

| Updated on: Oct 14, 2022 | 5:41 PM

Seat Belts : मुंबई शहरात आता प्रवेश करताना सीटबेल्टचा नियम पाळावा लागणार आहे..काय म्हणाले मुंबई पोलिस..

Seat Belts : सीट बेल्ट बांधा नाहीतर पावती फाडेल की पोलीस मामा..
सीटबेल्ट बांधा, नाहीतर दंड
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

मुंबई : आता कारमधील मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट (Seat belt) बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने (Central Government) यापूर्वीच याविषयीची घोषणा केली आहे. त्यासाठी लवकरच कायद्या ही आणण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच अनेक राज्यांनी या नियमांच्या अंमलबजावणीवर जोर द्यायला सुरुवात केली आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याविषयी आघाडी घेतली आहे. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मागील प्रवाशांनाही सीटबेल्ट बांधणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही या नियमाचे (Rules) पालन केले नाही तर तुमच्या डोक्याला ताप होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पीटीआय(PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मागील सीटवरील प्रवाशांना सीटबेल्ट बांधणे अनिवार्य केले आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून मुंबईत हा नियम अनिवार्य करण्यात येणार आहे. याविषयीचं ट्विट (Twit) पीटीआयने केले आहे.

मागील सीटवरील प्रवाशांना नवीन नियमानुसार बेल्ट लावणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी या नियमांचे पालन न केल्यास गाडीत अलार्म वाजेल. जोपर्यंत प्रवाशी सीटबेल्ट बांधत नाहीत, तोपर्यंत हा अलार्म वाजत राहणार आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने याविषयीचा मसूदाही तयार केला आहे. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे देशात मागील सीटवरील प्रवाशांना सीटबेल्ट बांधणे आवश्यक राहिल.

हा नियम लागू करण्यासाठी जनतेकडून 5 ऑक्टोबरपर्यंत हरकतीही मागविण्यात आल्या आहेत. हरकतीनुसार नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. सीटबेल्टचा वापर हा पूर्वीपासूनच अनिवार्य होता. पण यासंदर्भात कुठलाही कायदेशीर कारवाई करण्यात येत नव्हती. पण आता मागील सीटवरील व्यक्तींसाठीही कायदा कडक करण्यात येत आहे.

टाटा सन्सचे (Tata Sons) माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी सीटबेल्ट बांधला नव्हता. रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू ओढावला. त्यानंतर केंद्र सरकार आता कारमधील सर्वांसाठी सीटबेल्ट बांधणे अनिवार्य करण्याविषयी गंभीर झाले आहे.