Gold rate today : आज काय आहे सोन्याचा भाव? भाव चढणार की उतरणार? काय म्हणतायत Expert?

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं तेजीतच आहे. (Gold rate international market) 2.45 डॉलरच्या तेजीसह 1779.10 डॉलर प्रती आऊंसच्या पातळीवर ते ट्रेड करत होतं. (What is the price of gold today, Will prices go up or down, What is an Expert)

Gold rate today : आज काय आहे सोन्याचा भाव? भाव चढणार की उतरणार? काय म्हणतायत Expert?
सोन्याची चकाकी मावळली, चांदीला झळाळी!

मुंबई : आठवड्याच्या शेवटी स्थानिक मार्केटमध्ये सोन्याचे भाव जशास तसे आहेत. (Gold rate today) आज सकाळी ते 78 रुपयाच्या तेजीत सुरु झाले. सकाळी 11.15 वाजता, ऑगस्ट डिलिवरीवालं सोनं, 36 रुपये चढ्या भावासह, 46 हजार 906 रुपये प्रति दहा ग्राम असं ट्रेड करत होतं. तर ऑक्टोबरमध्ये ज्या सोन्याची डिलिवरी होणार आहे ते 22 रुपयांच्या तेजीसह 47 हजार 190 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत होतं. (Gold Price today) (What is the price of gold today, Will prices go up or down, What is an Expert)

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं तेजीतच आहे. (Gold rate international market) 2.45 डॉलरच्या तेजीसह 1779.10 डॉलर प्रती आऊंसच्या पातळीवर ते ट्रेड करत होतं. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही (Silver latest price) तेजी पहायला मिळते आहे. जुलै डिलिवरीवाली चांदी 267 रुपयाच्या तेजीसह 68 हजार रुपय प्रती किलोग्रामच्या स्तरावर ट्रेड करत होती. त्याचप्रमाणे सप्टेबर डिलिवरीवाली चांदी 284 रुपयाच्या तेजीसह 69 हजार 33 रुपये प्रती किलोग्रामच्या स्तरावर ट्रेड करत होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीला चमक आहे. चांदी 0.107 डॉलर तेजीसह 26.157 डॉलर प्रती आऊंसच्या स्तरावर ट्रेड करत होती.

गुरुवारी सोन्याच्या दरात घट, चांदीला तेजी

IBJA च्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार, 24 जूनला 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 47 हजार 216 रुपये प्रती दहा ग्राम एवढा होता. चांदीचा भाव 68 हजार 123 रुपये प्रती किलो एवढा होता. दिल्लीच्या बाजारात 24 जूनला सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या भावात तेजी पहायला मिळाली. गुरुवारी सोनं 93 रुपयाच्या घटीसह प्रती 10 ग्राम 46 हजार 283 एवढं होतं. चांदीची किंमत 99 रुपयाच्या तेजीसह 66 हजार 789 रुपये प्रती किलोवर पोहोचली होती.

कसा राहील सोन्या चांदीचा ट्रेंड?

Prithvifinmart Commodity Research चे डायरेक्टर मनोजकुमार जैन यांचं म्हणणं आहे की, सोन्याच्या दरातली अस्थिरता कायम राहील. सोन्यासाठी 1764-1750 डॉलवर सपोर्ट आहे जेव्हा की रेसिसटंस 1788-1800 डॉलरच्या पातळीवर आहे. MCX वर सोन्याला सपोर्ट 46660-46500 चा स्तर आहे, तर रेसिस्टंस 47055-47280 च्या पातळीवर आहे.

डॉलर इंडेक्समध्ये घट, यील्ड हिरवं निशाण

आज डॉलर इंडेक्समध्ये (Dollar Index) घसरण पहायला मिळतेय. 0.047 अंकाच्या घसरणीसह 91.748 च्या स्तरावर होता. हा इंडेक्स जगातल्या 6 प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलर किती मजबूत आहे तो दाखवतो. 10 वर्षाचा अमेरिकन बॉन्ड यील्ड यावेळेस हिरव्या निशाणसह 1.494 च्या पातळीवर होता. (What is the price of gold today, Will prices go up or down, What is an Expert)

इतर बातम्या

Delta Plus variant : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्री टोपेंची माहिती

आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करुन देणारा, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं टीकास्त्र

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI