आता इंटरनेटशिवाय आपण करू शकतो पैशांचे व्यवहार, UPI Light नेमके आहे तरी काय?

| Updated on: Jan 26, 2022 | 6:26 PM

लवकरच तुम्ही विना इंटरनेट शिवाय डिजिटल पेमेंट करू शकता.फिचर फोनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे पेमेंट करू शकाल. काय आहे नेमकी ही पद्धत आणि कशाप्रकारे केले जाईल तुमचे पेमेंट? जाणून घेवूया याबद्दल सविस्तर...

आता इंटरनेटशिवाय आपण करू शकतो पैशांचे व्यवहार, UPI Light नेमके आहे तरी काय?
UPI Light
Follow us on

मुंबई :आता तुम्ही विना इंटरनेट शिवाय सुद्धा डिजिटल पेमेंट करू शकाल.नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआई (NPCI) यावर टेस्टिंगचे काम करत आहे, यामध्ये तुम्ही कोणताही इंटरनेट कनेक्शन शिवाय यूपीआय आधारावर डिजिटल पेमेंट करू शकतात.या तंत्रज्ञानाला नाव देण्यात आलेले आहे यूपीआय लाइट ( UPI Light). या पद्धतीचा सर्वात जास्त फायदा खेडोपाड्यात राहणाऱ्या करोडो लोकांना होणार आहे, जेथे अद्याप ही इंटरनेटची सुविधा चांगल्या प्रमाणत उपलब्ध नाही आहे.यूपीआय लाइट द्वारे कोणतीही व्यक्ती फक्त आपल्या फिचर फोनच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करू शकतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार यूपीआय लाइट चा सर्वात आधी उपयोग ग्रामीण क्षेत्रातील 200 रुपयापेक्षा कमी असणाऱ्या पेमेंटसाठी केला जाईल. येथे आम्ही तुम्हास सांगू इच्छितो की, आरबीआय (RBI) ने आधीच 5 जानेवारीला विना इंटरनेट शिवाय 200 रुपये पर्यंत पेमेंट करण्याची परवानगी दिलेली आहे.

चला तर मग आता आपण जाणून घेऊया यूपीआय लाइट कशा पद्धतीने काम करते याबद्दल…

हि तंत्रप्रणाली दोन प्रकारे काम करते.पहिल्या पद्धतीमध्ये सीम ओवरले आणि दुसरी पद्धत मध्ये एक सॉफ्टवेअर असते ,या दोन्ही पद्धतीच्या आधारे की तंत्रप्रणाली कार्य करेल.

सिम ओवरले ही एक तांत्रिक पद्धत आहे ,त्यामध्ये सिम कार्डचे जे काही फीचर्स असतात ते वाढवण्यात आलेले असतात ज्यामुळे विना इंटरनेट शिवाय सुद्धा तुमचे पेमेंट होऊ शकेल. टेलिकॉम ऑपरेटरच्या द्वारे युजरच्या फोनमध्ये ही एक सिस्टम उपलब्ध केली जाईल. युजरला स्टोअरवर जाऊन आपल्या फोनमध्ये ही सिस्टम टाकावी लागेल. या टेक्निक पेमेंटसाठी टेलिकॉम नेटवर्कचा उपयोग केला जाईल

यामुळे असे होईल की, एसएमएसच्या माध्यमातून यूपीआय आयडी जनरेट होईल. युपीआय आयडी जनरेट झाल्यानंतर यूजर कॉन्टॅक्ट लिस्ट मधील एक नाव निवडेल , हवी असलेली रक्कम टाईप केल्यावर त्याचे पेमेंट प्रक्रिया पूर्ण होईल.

परंतु या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपल्याला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीकडे सुद्धा यूपीआय आयडी असणे गरजेचे आहे. सोबतच आपल्याला एक पिन नंबर सुद्धा सेट करावा लागेल तर अशा पद्धतीने ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे ती समजून घेण्यासाठी अतिशय सोपी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया इंटरनेट शिवाय फक्त एसएमएस नेटवर्कद्वारे पार पाडली जाऊ शकते.

एनपीसीआय या तांत्रिक बाबीला कशा प्रकारे आपल्या समोर आणते आणि कशाप्रकारे याची टेस्टिंग पूर्ण करते त्यामुळे लवकरात लवकर लोकांना ही सुविधा मिळू शकेल हेच जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Gold price Today : सोन्यात गुंतवणूक करायची? जाणून घ्या- मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतील आजचे भाव

तुम्ही इनकम टॅक्स जर भरत नसाल तर आताच भरा, आयटीआर फाइल टॅक्स भरण्याचे मिळतात खूप सारे फायदे !!

Investment Planning | डिव्हिडंड फंड की ग्रोथ फंड, दोघांमध्ये कोण आहे बेस्ट? जाणून घ्या!