तुम्ही इनकम टॅक्स जर भरत नसाल तर आताच भरा, आयटीआर फाइल टॅक्स भरण्याचे मिळतात खूप सारे फायदे !!

जर एखाद्या कारणामुळे दिलेल्या कालावधीमध्ये तुमचे रिटर्न भरायचे राहून गेल्यास तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.आयटीआर फाइल बनवण्याचे अनेक फायदे असतात चला तर मग जाणून घेऊया त्या फायदा बद्दल...

तुम्ही इनकम टॅक्स जर भरत नसाल तर आताच भरा, आयटीआर फाइल टॅक्स भरण्याचे मिळतात खूप सारे फायदे !!
आयकर परतावा
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 5:15 PM

असेसमेंट ईयर 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (income tax return) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. जर तुमचे एकंदरीत वर्षभरातील इनकम (income) 2.5 लाख रुपये व त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आयटीआर फाईल भरणे जरुरी आहे. जर एखाद्या कारणामुळे दिलेल्या कालावधीमध्ये तुमचे रिटर्न भरायचे राहून गेल्यास तर तुम्हाला दंड(punishments) भरावा लागू शकतो.आयटीआर फाइल बनवण्याचे अनेक फायदे असतात , चला जाणून घेऊया आयटीआर बद्दल असेल कोणकोणते फायदे (Benifits)असतात जे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. इन्कम टॅक्स रिटर्न तुमच्या कमाईचे साधन मानले जाते.जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये लोनसाठी आपलाय करत असेल तर आणि बँक तुमच्याकडे आयटीआर मागत असेल आणि अशावेळी जर तुमच्याकडे आयटीआर फाईल नसेल तर तुम्हाला बँकेकडे तुमच्या कमाई चे वेगवेगळे व दुसरे साधन म्हणून काही कागदपत्रे दाखवावे लागतात. जर तुम्ही नियमितपणे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरत असाल तर तुम्हाला बँकेकडून सहज लोन उपलब्ध होते आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचे कर्ज म्हणजे होम ,बिझनेस , पर्सनल आणि ऑटो लोन सुद्धा तुम्हाला मिळते.

विमा संरक्षण वाढवण्यासाठी मदत करते

जर तुम्ही 1 कोटी रुपयाचा तर इन्शुरन्स घेऊ इच्छित असाल तर अशा वेळी इन्शुरन्स कंपनी तुमच्याकडून इन्कम टॅक्स रिटर्न फाईलची मागणी करत असतात. तुम्ही नेमके काय काम करतात? तुमच्या कमाईचे साधन म्हणजेच सोर्स काय आहे आणि तुम्ही घेतलेले कर्ज योग्य कालावधी मध्ये परत करू शकणार आहात की नाही याबद्दलची माहिती साठी कंपनी आयटीआर फाईल मागत असतात पाहिल्यानंतर कंपनी विमा संरक्षण सुनिश्चित करते.

पासपोर्ट बनवण्यासाठी आणि वीजा मिळवण्यासाठी होते मदत

इन्कम टॅक्स रिटर्नची कॉपी आपला ऍड्रेस प्रूफ म्हणजेच राहण्याचा पुरावा म्हणून कामात येतो, याच्या आधारावरच तुम्ही तुमचा पासपोर्ट सुद्धा बनवू शकतात याशिवाय आयटीआर फाईल द्वारे आपला वीजा सुद्धा मान्य होतो आणि म्हणूनच जर तुम्हाला वीजा हवा असेल तर अशावेळी आयटीआर फाईल एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून सुद्धा उपयोगी पडू शकते. जर तुम्हाला एखाद्या कामाच्या निमित्ताने परदेशी जायचं आहे आणि तुम्हाला अशा वेळी वीजेची आवश्यकता आहे तेव्हा वीजे साठी तुम्हाला विदेशी दूतावासाला गेल्या दोन वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखवावा लागतो आणि अशी मागणीसुद्धा त्यांच्याकडून केली जाते.

याशिवाय जर तुम्हाला सरकारी कॉन्ट्रॅक्ट प्राप्त करायचे आहे अशा वेळीसुद्धा आयटीआर कामात येतो.जर आपल्याला एखाद्या सरकारी विभागाचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त करायचे असेल तर अशावेळी गेल्या पाच वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न भरलेली फाईल आपल्याला दाखवणे गरजेचे ठरते तसेच तुमच्या पगारातून टीडीएस कमी झाला असेल तर त्याला परत मिळवण्यासाठी आयटीआर फाईल जमा करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच आपल्याला इन्कम टॅक्स फाईल रिटर्न वेळोवेळी भरायला हवा.

ही आहे आयटीआर फाईल भरण्याची प्रक्रिया

आर्थिक वर्ष 2020 – 21 इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्याची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. जर तुम्ही आतापर्यंत आयटीआर फाईल भरला नसेल तर लवकरात लवकर आयटीआर फाईल बनवा अन्यथा उशीर झाल्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न फाईल बनवू शकता. तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जाऊन पुढील वेबसाईटवर www.incometax.gov.in तुम्हाला लॉगिन करायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची रिटर्न फाईल बनवू शकता.

Investment Planning | डिव्हिडंड फंड की ग्रोथ फंड, दोघांमध्ये कोण आहे बेस्ट? जाणून घ्या!

Home Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत

नाव मोठं लक्षण खोटं! नावाजलेल्या 16 कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांचे देव पाण्यात, कोणते आहेत ते IPO?

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.