Blue Tick : ट्विटर ठरणार दुभती गाय, ब्ल्यू टिक ठरणार वरदान, एलॉन मस्काला दरमहा मिळणार इतके कोटी ..

| Updated on: Nov 04, 2022 | 5:35 PM

Blue Tick : ब्लू टिकच्या माध्यमातून एलॉन मस्कला दुभती गाय भेटली आहे.

Blue Tick : ट्विटर ठरणार दुभती गाय, ब्ल्यू टिक ठरणार वरदान, एलॉन मस्काला दरमहा मिळणार इतके कोटी ..
ब्लू टिकचा व्यवसाय
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ब्लू टिकसाठी (Blue Tick) 8 डॉलर म्हणजे जवळपास 660 रुपये शुल्क वसूली करण्याचे पक्के ठरवले आहे. अर्थात हा निर्णय काही सर्वांना रुचला नाही. काहींनी ट्विटर बॉयकॉटची घोषणा ही केली आहे. पण त्याचा काही एक परिणाम झालेला नाही. मस्क हे पक्के व्यावसायिक (Businessman) आहे, त्यांना कमाईचे गणित चांगलेच ठाऊक आहे..

ट्विटर खरेदीसाठी मस्क यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. निधी जुळवण्यासाठी त्यांच्या मूळ व्यवसायावर दडपण आले आहे. त्यामुळे मस्क यांना आता जादा आर्थिक झळ सहन करायची नाही.

मस्क हे ट्विटरच्या माध्यमातून कमाईचे साधन तयार करत आहे. त्यात पहिला क्रमांक ब्लू टिकचा लागला आहे. अर्थात ट्विटर हे बिझनेस मॉडेल म्हणून मस्क विकसीत करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

सीएनबीसी टीव्ही18 च्या ताज्या अहवालानुसार, ट्विटरकडे जवळपास 4.24 लाख व्हेरिफाईड युझर्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे ब्लू टिक आहे. आता या युझर्संना आता दरमहा 660 रुपये मोजावे लागणार आहे. तर त्यांना ब्लू टिकचे फायदे, सुविधा मिळतील.

एका युझर्सला 660 रुपये दरमहा शुल्क आकारल्यास इतक्या युझर्सच्या माध्यमातून मस्कला दुभती गाय मिळाली आहे. या माध्यमातून मस्क दरमहिन्याला जवळपास 28 कोटी रुपये मिळतील. वार्षिक हा आकडा 300 कोटींच्या पुढे जातो.

विशेष म्हणजे आता पूर्वीसारखे ब्लू टिकसाठी अकाऊंट व्हेरिफाय करण्याची गरज उरली नाही. पैसे मोजा आणि ब्लू टिक घ्या, एवढा सोपा व्यवहार झाला आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएटरपासून तर अन्य अनेकांना ही सुविधा खरेदी करता येईल. त्यामुळे युझर्सची संख्या वाढेल.

ट्विटर व्हेरिफिकेशन आणि ब्लू टिकचा ही सेवा 2009 मध्ये सुरु करण्यात आली होती. पूर्वी अधिकारी, एजन्सी, कलाकार, खेळाडू, प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांसाठीही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.