AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 29 June 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 29 June 2021

| Updated on: Jun 29, 2021 | 8:45 AM
Share

जम्मू-कश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे ‘गुपकार’ गँगशी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी चर्चा केली. एकमेकांचे हसतमुख फोटो काढून प्रसिद्ध केले. या प्रकारास 72 तास होत नाहीत तोच जम्मू-कश्मीरात हिंसाचार व दहशतवादी हल्ल्यांचे थैमान सुरू झाले आहे.

जम्मू -कश्मीरचा प्रश्न फक्त लष्कर किंवा बंदुकीच्या गोळीतूनच सुटेल, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करूनच सुटेल या मानसिकतेतून सरकार बाहेर आले आहे. संवाद आणि चर्चा यापासून कायमचे दूर जाता येणार नाही. कश्मीरमधील परिस्थिती बरी नाही . ‘गुपकार’ गँगबरोबरचे हसरे फोटो व चर्चा वरवरच्या आहेत असे जम्मू – कश्मीरातील कालच्या दहशतवादी हल्ल्यावरून दिसते. कश्मीरातील नवे हल्ले चिंता वाढविणारे आहेत, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

जम्मू -कश्मीरमधील राजकीय हालचालींना वेग येत असतानाच फुटीरतावादी संघटना तसेच दहशतवादी टोळ्याही आक्रमक झाल्याचे दिसते. जम्मू-कश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे ‘गुपकार’ गँगशी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी चर्चा केली. एकमेकांचे हसतमुख फोटो काढून प्रसिद्ध केले. या प्रकारास 72 तास होत नाहीत तोच जम्मू-कश्मीरात हिंसाचार व दहशतवादी हल्ल्यांचे थैमान सुरू झाले आहे. दहशतवाद्यांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून जम्मू विमानतळावरील हिंदुस्थानी हवाई दलाच्या तळावर बॉम्बहल्ला केला आहे. अर्थात या हल्ल्यामागे पाकचा हात असणारच. ते काहीही असले तरी पोलीस, वायुसेना व संपूर्ण संरक्षण व्यवस्थेलाच हे आव्हान आहे.

Published on: Jun 29, 2021 08:45 AM