Ganeshotsav 2025 : यंदा मुंबईत टाईट सिक्युरीटी, 15 हजार पोलीस सज्ज तर फक्त लालबागच्या राज्यासाठी ‘इतक्या’ पोलिसांचा फौजफाटा
मुंबईत ७ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३६ पोलीस उपायुक्त, , ५१ सहाय्यक पोलीस आयुक्त, २६०० पोलीस अधिकारी आणि १५ हजार पोलीस बंदोबस्त गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणार आहे.
गणेशोत्सव म्हटलं की मुंबईतील मोठ्या बाप्पांच्या मुर्त्या, सामाजिक संदेश देणारे बाप्पांचे देखावे हे दरवर्षीच लक्षवेधी ठरतं. दरम्यान, मुंबईतील गणपती बाप्पाच्या दर्शनाला राज्यभरातील भाविक दाखल होत असतात. त्यामुळे गणेशोत्सवात होणारी भाविकांची गर्दी बघता काही गैर प्रकार घडू नये यासह सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा फौजफाटा दहाही दिवस तैनात असल्याचे पाहायला मिळते. अशातच यंदा मुंबईतील गणेशोत्सवात चोख बंदोबस्तासाठी तब्बल १५ हजार मुंबई पोलीस सज्ज असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. तर लालबागच्या राजासाठी ५०० पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त यंदा राहणार आहे. तर गर्दी असणाऱ्या भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यासोबतच श्वानपथक, बीडीडीएस, १२ एसआरपी कंपनी, क्यूआरटी, ११ हजार सीसीटीव्ही कार्यान्वित असणार आहे. इतकंच चौपाटीवरही स्वतंत्र सीसीटीव्ही, यासह ४५० मोबाईल व्हॅन, ३५० बीट मार्शलचा देखील फिरता पहारा यंदाच्या गणेशोत्सवात असणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

